Beed : संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास CID कडे वर्ग; सलग दुसऱ्या दिवशी अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आसून हत्याप्रकरणातील आरोपीची सीआयडी कडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता या घटनेच्या तपासासाठीच्या घडामोडींना वेग आला असल्याचे चित्र आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आसून हत्याप्रकरणातील आरोपीची सीआयडी कडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. विष्णू चाटे यांची सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडेसह सीआयडी ॲक्शन मोड वर काम करत असताना पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास सुरू असतानाच फडणवीसांनी (Devendra Fadnavis)नुकतेच नागपुरात बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला होता. तर दुसरीकडे विरोधकांसह सर्वस्थरातून या घटनेचा निषेध होत असताना आता या घटनेच्या तपासाचे चक्र अधिक गतिमान झाल्याचे बोलले जात आहे.
रैनापुरात आज आक्रोश मोर्चा, 50 पेक्षा जास्त गावातून लोक येणार
मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील दोषी लोकांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. इत्यादि मागण्यांसाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रैनापुर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांच्या परिवारातील अनेक सदस्यया मोर्चात सहभागी होणार आहेत. रैनापुर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय अशा या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व बंदुकीचे लायसन्स तातडीने रद्द करा- सचिन खरात
बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या तरुण सरपंचाचा विचित्रपणे बेदम मारहाण करून खून करण्यात आला, त्यामुळे सध्या बीड जिल्हा चर्चेत आहे. परंतु याच बीड जिल्ह्यामध्ये 1222 हे बंदुकीचे परवानाधारक आहेत. जर इतर जिल्हे पाहिले तर बीड जिल्ह्यात पाच ते सहा पट बंदुकीचे परवानाधारक आहेत, त्यामुळे तत्काळ परवानाधारकांची पूर्णतपासणी करण्यात यावी आणि सध्या तातडीने सर्व बंदुकीची लायसन रद्द करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात पक्ष राज्य सरकारचे माननीय मुख्यमंत्री यांना करत असल्याचे सचिन खरात म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या