बीडमधील क्षीरसागर काका-पुतण्यामधील वाद शिगेला; गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल
Beed Crime News Live : बीडमधील क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्या संघर्ष संघर्ष शिगेला पोहोचला आहे. जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Beed Crime News Live Updates : राज्याच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्या संघर्ष काही नवा नाही. बीडच्या गोळीबारप्रकरणावरुन हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरा बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, नगरसेवक डॉ योगेश क्षीरसागर यांच्यासह सतीश पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरा बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, नगरसेवक डॉ योगेश क्षीरसागर यांच्यासह सतीश पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सतीश क्षीरसागर यांनी फिर्यादीमध्ये काय म्हटलंय
सतीश क्षीरसागर यांनी फिर्यादीमध्ये म्हटलं की, आठ दिवसापूर्वी मी हेमंत क्षीरसागर यांच्याशी चर्चा करण्यासाठी बंगल्यावर गेलो होतो. त्यावेळी डॉ.भारतभूषण व योगेश हे दोघे बोलत बोलत हॉलमध्ये आले. तेव्हा योगेश क्षीरसागर माझ्याकडे बोट करून भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी काही तरी बोलले. ते मी ऐकले नाही. परंतु हेमंत क्षीरसागर यांना फोन आल्यानंतर ते तेथून बाजूला गेले. तेव्हा योगेश क्षीरसागर यांनी मला व फारूक सिद्दीकी यांना आवाज देवून साहेब बोलावत आहेत असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यानंतर योगेश क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर यांना म्हणाले की, हे दोघे हेमंत क्षीरसागर यांच्यासोबत रोज असतात. हेच जास्त फडफड करतात. तेव्हा भारतभूषण आम्हा दोघांना म्हणाले की तुम्ही दोघे हेमंत क्षीरसागर सोबत राहू नका. तेव्हा मी त्यांना म्हणालो की आम्ही कोणासोबतही राहू तुमचा काही संबंध नाही. त्यावेळी योगेश म्हणाले, तुमची दोघांची फडफड लई होऊ लागली. जास्त हवेत उडू नका. आम्हाला माहिती आहे कुणाला कुठे दाबायचे आणि कुठे नाही. तेव्हा मी त्यांना तसे काही नाही असे म्हणालो. तेव्हा योगेश क्षीरसागर म्हणाले की आठ-दहा दिवसात तुम्हाला दाखवतो की आम्ही काय करू शकतो, असं सतीश क्षीरसागर यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha