एक्स्प्लोर

Beed Crime News: बीडच्या माजलगावमध्ये एटीएसची मोठी कारवाई; चौघांवर गुन्हा दाखल, दोघेजण ताब्यात, लातूरमध्ये बँक खाती

Beed Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवादी विरोधी पथकाने बीडच्या माजलगावमधील पात्रुड गावात कारवाई केली आहे.

Beed Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवादी विरोधी पथकाने बीडच्या माजलगावमधील पात्रुड गावात कारवाई केली आहे. अहिल्यानगरच्या फैजान ए-कन्झूल इमान या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून गुलजार ए-रझा ट्रस्टच्या नावाने लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली 4 कोटी 73 लाख 67 हजार 503 रुपयांचा निधी जमा करण्यात आला. संबंधित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या एटीएस ने छापा मारत  दोघांना ताब्यात घेतले.

यामध्ये चार जणांविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इमरान कलीम शेख (सदर बाजार, अंबाजोगाई), मुज्जम्मिल नूर सय्यद (सत्तार गल्ली पात्रुड), अहमदुद्दीन कैसर काझी (रोजा मोहल्ला, केज) व तौफीक जावेद काझी या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुज्जम्मिल नूर व अहमदुद्दीन काझी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.पात्रुडमध्ये गुलजार ए रझा या नावाच्या ट्रस्टची चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे कागदपत्रांच्या आधारे आढळून आले. या ट्रस्टच्या नावाने लातूरमधील ॲक्सिस बँकेमध्ये पाच बोगस खाते तयार करण्यात आले होते. या खात्यात चार कोटी रुपये जमा करण्यात आले होते. 

ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांची डीड नाेंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक-

सदर निधी धार्मिक कामाच्या संदर्भाने जमा करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुलजार ए रझाची बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील दुय्यम निबंधक कार्यालयांकडून माहिती घेतली असता याची तेथेही त्यांची नाेंदणी आढळून आली नाही. ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांची डीड नाेंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही वरील ट्रस्टची माहिती घेतली असता त्यांच्याकडे नाेंदणी नसल्याचे कळवले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे ताे इम्रान शेख हा गुलजार ए रझा ट्रस्टचा अध्यक्ष, सय्यद मुज्जम्मिल हा उपाध्यक्ष, असमदुद्दीन कैसर काझी हा सचिव तर ताैफीक काझी याचा विश्वस्त म्हणून बँकेच्या खात्यांमध्ये नाेंदणी असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Beed Crime : मोठी बातमी! बीडमधील गुलजार-ए-रझा ट्रस्टचा कोट्यवधींचा घोटाळा उघड; एटीएसकडून 4 विश्वस्तांवर गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget