Beed : हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणार्या कैलास फडला दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर
हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणार्या कैलास फडला परळी कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कैलास फडला परळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून जामीन मंजूर झाला आहे.
बीड : हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणार्या कैलास फडला परळी कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कैलास फड याला परळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जमीन मंजूर झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाने दाखवल्यानंतर आणि सोशल मीडियातून हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करत अटक केली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांचा कार्यकर्ता कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला होता.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र आज कोर्टाने या प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर कैलास फड याला परळी कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.
गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास सुरू असतानाच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज नागपुरात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला.
तर दुसरीकडे बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास सुरू असतानाच फडणवीसांनी (Devendra Fadnavis)नुकतेच नागपुरात बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला होता. तर दुसरीकडे विरोधकांसह सर्वस्थरातून या घटनेचा निषेध होत असताना आता या घटनेच्या तपासाचे चक्र अधिक गतिमान झाल्याचे बोलले जात आहे.
बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर, सुरेश धस यांचा आरोप
एकीकडे विरोधकांकडून धनंजय मुंडे टार्गेट होत असताना दुसरीकडे महायुतीतल्याच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यस्था आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित त्यांनी केला. तसंच जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर सुरू असल्याचाही गंभीर आरोप धस यांनी केला. केवळ एवढंच नव्हे तर, बीडच्या मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदासह पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री स्वीकारायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
हे ही वाचा