एक्स्प्लोर

धक्कादायक! बीडमध्ये पैशांसाठी पुन्हा अपहरण, मुलगा जिवंत हवा असेल तर आता 50 हजार टाका अन्यथा...

पैशांच्या वादातून हाणामारी, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, किरकोळ वादावादीतून जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीच्या गंभीर घटना घडत असतानाच बीडच्या धारूरमध्ये पैशांसाठी पुन्हा एकदा अपहरण झालं आहे.

Beed: बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. पैशांच्या वादातून हाणामारी, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, किरकोळ वादावादीतून जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीच्या गंभीर घटना घडत असतानाच बीडच्या धारूरमध्ये पैशांसाठी पुन्हा एकदा अपहरण झालं आहे. धारूरमध्ये उसने पैसे वसूल करण्यासाठी चार तरुणांनी एका तरुणाचे अपहरण केलं. मुलाच्या घरी फोन करून मुलगा जिवंत हवा असेल तर आताच्या आता 50 हजार रुपये टाका  अन्यथा मुलगा तुम्हाला परत दिसणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धारूर पोलिसांनी  दोघांना अटक करण्यात आली आहे. (Crime News)

 नेमकं घडलं काय?

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या उसनवारीवरून तब्बल 80 हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी थेट तरुणाच्या आईला फोन करून धमकी दिली – "मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार पाठवा, नाहीतर तो कधी दिसणार नाही. "ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे. कृष्णाने काही महिन्यांपूर्वी धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, आरोपींनी या रकमेवर दिवसाला 1 हजार रुपयांचे व्याज लावले होते. याच हिशेबाने व्याजाची रक्कम 80 हजारांवर गेली. पैसे मिळवण्यासाठी कृष्णाचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी कृष्णाच्या आईला फोन करून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला सोडणार नाही, अशी थेट धमकी देण्यात आली. घाबरलेल्या आईने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

दोघांना अटक, दोन जण फरार

या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा याने धनराज चाटे पृथ्वीराज राग व परमेश्वर आगाव यांच्याकडून पैसे उसने घेतले होते त्याचे व्याज दिल्याचे कारण सांगत या तिघांसह अन्यकाने कृष्णाचे अपहरण केले होते. या प्रकरणात धारूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

दहा हजार रुपयाला एक हजार रुपये रोज!

अपहरण करणाऱ्या आरोपींनी कृष्णा याला जे दहा हजार रुपये दिले होते त्याला एक हजार रुपये रोजाप्रमाणे व्याज होते आणि त्याचेच 80 हजार रुपये झाल्याने अपहरणासारखा प्रकार आपण व मारहाणी सारखा प्रकार या आरोपींनी केला हा प्रकारा अतिशय गंभीर असून आता पोलीस या आरोपींनी अशा पद्धतीने इतर काही गुन्हे केले आहेत का याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं 

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget