Beed Crime : अंबाजोगाईमध्ये व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक
Beed Crime : अंबाजोगाईमध्ये व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींला अटक करण्यात आली आहे.
Beed Crime : बीडच्या अंबाजोगाईत एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. घटनेतील आरोपींना पोलिसांनी 18 तासात ताब्यात घेतले आहे. यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याची खात्री पोलिसांकडून केली जात आहे. दुकानात काम करणाऱ्या नोकरानेच दुकान मालक सुजित सोनी याची टीप आरोपींना दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
अधिकची माहिती अशी की, अंबाजोगाईतील व्यापारी सुजित सोनी दिवसभरातील काम आटोपून दुचाकीवरून घरी जात असताना अनोळखी इसमांनी दुचाकी अडवून सोनी यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यातील आरोपींना पोलिसांनी 18 तासात ताब्यात घेतल्या असून चौकशी सुरू आहे. दिवसभराचे काम आटोपून घराकडे निघालेल्या तरुण व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना अंबाजोगाई शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर बुधवारी (दि.15) रात्री घडली होती.
सुजीत श्रीकृष्ण सोनी (रा. अंबाजोगाई) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीत सोनी दिवसभराचे कामकाज आटोपून दुचाकीवरून घराकडे निघाले होते. ते शासकीय विश्रामगृहासमोर आले असता अनोळखी तीन व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार हल्ला करण्यात आला होता.
Dombivli Crime : 8 वर्षीय चिमुकलीवर ट्युनश टिचरच्या भावाकडून लैंगिक अत्याचार, डोंबिवलीतील धक्कादायक घटनाhttps://t.co/84eOIfy84R
— ABP माझा (@abpmajhatv) January 16, 2025
सुजीत यांनी कसेबसे हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवून दुचाकीवरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या सुजीत सोनी यांच्यावर अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी कोणत्या कारणास्तव हल्ला केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन तपास सुरू केला आहे.
12 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, जवानांकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्माhttps://t.co/G2chYaASnZ
— ABP माझा (@abpmajhatv) January 16, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या