एक्स्प्लोर

Baramati Crime : बारामतीत ID कार्ड मागितल्याचा आरोप, अधिकाऱ्याने टोल कर्मचाऱ्याला उठाबशा काढायला लावल्या

Baramati Crime News : बारामतीत टोल नाक्यावर ओळखपत्र मागितले म्हणून टोल नाक्यावर काम करणाऱ्या मुलाला चक्क उठाबशा काढायला लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Baramati Crime News : बारामतीत (Baramati) कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय. त्यामागील कारण म्हणजे,  टोल नाक्यावर ओळखपत्र मागितले म्हणून टोल नाक्यावर काम करणाऱ्या मुलाला चक्क उठाबशा काढायला लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. टोल नाक्यावर काम करणाऱ्या मुलाला आरटीओच्या गाडीतून आलेल्या व्यक्तीनं या उठाबशा काढायला (Crime News) लावल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे.

संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गावरील टोल नाक्यावरचा हा प्रकार असून हे प्रकरण उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आरटीओने केलेल्या कृत्याच्या विरोधात बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई केलात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय? 

तीन दिवसापूर्वी आरटीओमध्ये काम करणारी एक व्यक्ती एका खाजगी गाडी घेऊन बारामती तालुक्यातील उंडवडी येथील टोल नाक्यावर आली. त्यावेळी तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने त्या आरटीओला अडवलं.  त्यावेळी मी आरटीओत काम करत असल्याचे त्या संबंधित व्यक्तीने सांगितले. त्यावेळी टोल नाक्यावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीला ओळखपत्र मागितलं. त्यानंतर ती व्यक्ती तिथून निघून गेली. मात्र, ओळखपत्र मगितल्याचा राग मनात ठेवला आणि त्यानंतर काल दुपारी बाराच्या दरम्यान उंडवडी येथील टोल नाक्यावर आरटीओची गाडी आली. परंतु त्या गाडीने टोलनाका पार केला नाही. टोलनाक्यावर गाडीने यु टर्न घेतला.

त्यानंतर गाडीतून खाली उतरून गाडीत आलेले टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासू लागेल. त्यावेळी तिथल्या मॅनेजरने त्यास मज्जाव केला. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्याने आरटीओला ओळखपत्र मागितले होते. त्या कर्मचाऱ्यांची काल सुट्टी होती, परंतु तो काल कामानिमित्त टोल नाक्यावर आला होता. त्यानंतर त्या टोल नाक्यावर काम करणाऱ्या मुलाला बोलावलं आणि त्याला उठाबशा काढायला लावल्या असल्याचे टोल नाक्याचे मॅनेजर संतोष खापरे यांनी सांगितले.

कॅमेरा नाही त्या ठिकाणी उठाबशा काढायला लावल्या 

दरम्यान, या प्रकरणातील उठाबशा काढतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले नाहीत. कारण ज्या ठिकाणी कॅमेरा नाही त्या ठिकाणी उठाबशा काढायला लावले असल्याचे टोल नाक्याचे मॅनेजर संतोष खापरे यांनी सांगितले. आरटीओने केलेल्या कृत्याच्या विरोधात बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरटीओचे बजरंग कोरावळे यांनी उठाबशा काढायला लावले असल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. आता आरटीओ या वर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारीTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PMTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Embed widget