एक्स्प्लोर

Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं

Mumbai Crime Police: मुंबई पोलिसांनी ड्रग्ज पेडरला पकडायला सापळा रचला आणि स्वत:चाच कॉन्स्टेबल अलगद जाळ्यात सापडला, मुंबई पोलीस दलात खळबळ माजली आहे.

Mumbai Crime Police: देशातील नावाजलेल्या आणि कार्यक्षम पोलीस दलांमध्ये समावेश असलेल्या मुंबई पोलिसांच्या नावाला काळिमा फासणारा एक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज तस्करीच्या (Drugs) एका प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल किरण इंदुलकर (Kiran Indulkar) असे त्याचे नाव आहे. मालवणी पोलिसांनी ड्रग्ज विक्री करताना किरण इंदुलकर याला रंगेहाथ पकडले आहे. किरण इंदुलकर हा सध्या जोगेश्वरी (Jogeshwari)पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी तो मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो ड्रग्जची विक्री करत असल्याचा संशय होता. त्यानुसार मालवणी पोलिसांनी सापळा रचून किरण इंदुलकर याला 5 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) किंवा 'म्याव-म्याव' विकताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या गुन्ह्यातील सहभागामुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली आहे. (Mumbai Crime news)

किरण इंदुलकर हा बीडीडी नायगाव येथील रहिवासी आहे. इंदुलकर पूर्वी मालवणी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याला या परिसरातील ड्रग्ज नेटवर्कची माहिती असल्याचा संशय आहे. मालवणी पोलीस ठाण्यात असताना किरण इंदुलकर हा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला होता. त्यावेळीच त्याच्याबाबत संशय असल्यामुळे किरण इंदुलकर हा तेव्हापासूनच संबंधित तपासयंत्रणांच्या रडारवर होता. 

यापूर्वीही किरण इंदुलकर याच्याबाबत तक्रारी आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी ताकीद देऊन इंदुलकरची बदली करण्यात आली होती. तसेच त्याला निलंबितही करण्यात आले होते. सध्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या इंदुलकरला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Mumbai Police: पोलिसांनी किरण इंदुलकरला पकडण्यासाठी सापळा कसा रचला?

मालवणी पोलिसांना या परिसरातील गेट क्रमांक 8 जवळ ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी एका व्यक्तीला अमली पदार्थ विक्रेता म्हणून उभे केले. त्यावेळी किरण इंदुलकर त्याठिकाणी आला. त्याने 15 हजार रुपयांना चार ग्रॅम एमडी खरेदी केले. हा व्यवहार पूर्ण होताच, पोलिसांनी किरण इंदुलकर याला तात्काळ अटक केली. मात्र, तो पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे पोलिसांनाही माहिती नव्हते. नंतर पोलिसांना किरण इंदुलकर हा कॉन्स्टेबल असल्याचे समजले तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

इतर बातम्या

Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात भरपूर हुंडा दिला, तरीही पैशांसाठी तगादा लावला, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी
लग्नात भरपूर हुंडा दिला, तरीही पैशांसाठी तगादा लावला, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी
Baramati Crime : थरकाप उडवणारी घटना! गरोदर महिलेवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; दोन तासांत आरोपीला बेड्या
थरकाप उडवणारी घटना! गरोदर महिलेवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; दोन तासांत आरोपीला बेड्या
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget