Crime News: अश्लील व्हिडिओ बनवून 3.8 कोटी उकळले, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
Crime News: कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याचदरम्यान, सायबर गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

Crime News: कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याचदरम्यान, सायबर गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार मानसिक दृष्टीने कमजोर असेलल्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबाद (Ghaziabad) येथे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी अश्लील चॅटद्वारे नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे उकळत होती. या टोळीने नागरिकांची फसवणूक करून आतापर्यंत 3 कोटीहून अधिक रुपये लुटले आहेत. याप्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तसेच नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही फसवणुकीला बळू पडू नये, असेही आवाहन केले आहे.
Shirur Bank Robbery : शिरुरमध्ये पिस्तुलीचा धाक दाखवत दरोडेखेरांकडून दागिने आणि 30 लाख रुपये लंपास
गाझियाबाद शहराचे एसपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, या टोळीत एका जोडप्यासह तीन महिलांचा समावेश आहे. त्यांनी राजनगर एक्स्टेंशनच्या सोसायटीमध्ये भाड्याने फ्लॅटही घेतला होता. ही टोळी नागरिकांसोबत अश्लील चॅट करून त्यांची फसवणूक करायचे. त्यांच्याकडून चार बॅंक खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. या चार बँक खात्यांमध्ये सुमारे 3.8 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ही सर्व खाती जप्त केली आहेत. ही टोळी लोकांना अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायची, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
गुजरातमधील तरुणाची 80 लाखांची फसवणूक
याच टोळीने गुजरातमधील एका तरुणाची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपींनी संबंधित तरूणाला लक्ष्य करीत सोशल मीडियावर त्याचाशी मैत्री केली. दरम्यान, या तरूणाचा वैयक्तिक नंबर मिळून त्यांच्याशी चॅट करू लागले. त्यानंतर टोळीतील लोकांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी बोलून त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तरूणाला वारंवार ब्लॅकमेल करून आरोपींनी त्याच्याकडून तब्बल 80 हजार लुटल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
