एक्स्प्लोर

Badlapur School: जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला

Maharashtra Crime news: बदलापूरच्या शाळेत लहान मुलींवर अत्याचार. संतप्त नागरिकांनी रेल्वे वाहतूक रोखली. शाळेच्या सामानाची तोडफोड. बदलापूरमधील शाळेच्या अध्यक्षांना अश्रू अनावर. बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण

Badlapur Crime: बदलापूरच्या एका नामांकित  शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेमुळे सध्या बदलापूर शहरातील वातावरण अक्षरश: पेटले आहे. या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात अक्षम्य चालढकल केल्याने नागरिक आणि पालक कमालीचे संतापले आहेत. मंगळवारी सकाळी संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला. तर दुसरीकडे आंदोलकांचा जमाव बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसला आहे. काहीवेळापूर्वीच बदलापूर स्थानकात आंदोलकांनी रेल्वे पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली होती. तर दुसरीकडे शाळेबाहेरील आंदोलकांनी पोलीस सुरक्षेचे कडे भेदत शाळेच्या आतमध्ये शिरत तोडफोड केली. यावेळी आंदोलकांनी पेट्रोल ओतून शाळेचे वर्ग पेटवून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा अनर्थ टळला. या प्रकारानंतर पहिल्यांदाच शाळेचे अध्यक्ष प्रसारमाध्यमांसमोर आले. मात्र, शाळेत घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना शाळेचे अध्यक्ष भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

शाळेच्या अध्यक्षांनी आंदोलकांना शांत होण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले की, गेल्या आठवड्यात शाळेत जी घटना घडली ती निंदनीय आणि घृणास्पद आहे. आम्ही पोलिसांना जास्तीत जास्त सहकार्य करत आहोत. प्रशासन आणि मुलीच्या पालकांनाही आम्ही सहकार्य करतोय. तसेच आमच्या शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित कशा करता येतील, याचा विचार करत आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की, तुम्ही कुठल्यातरी गोष्टीचा राग या शाळेवर काढू नका. तुम्ही पण याच शाळेत शिकला आहात, मी पण... हे वाक्य बोलताना शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला. यानंत त्यांना बोलता आले नाही आणि त्यांनी डोळ्याला रुमाल लावत तेथून काढता पाय घेतला. 

पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा

आज सकाळीच बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. तेव्हापासून नागरिकांचा मोठा जमाव शाळेबाहेर जमला होता. मात्र, याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या एका पथकाने हा जमाव रोखून धरला होता. मात्र, काहीवेळापूर्वीच आंदोलकांच्या जमावापैकी काहीजण पोलिसांच्या सुरक्षेचे कडे भेदून आतमध्ये शिरले. या आंदोलकांनी शाळेत तोडफोड आणि नासधुस केली. या आंदोलकांनी सोबत पेट्रोल आणले होते, हे पेट्रोल ओतून शाळेत आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी शाळेच्या परिसरात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या शाळेच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

आणखी वाचा

बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget