एक्स्प्लोर

Badlapur School News: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली

Badlapur School News: बदलापूरमध्ये चार आणि सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील स्वच्छतागृहात एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. मुलींच्या पालकांना पोलिसांनी 12 तास ताटकळत ठेवले. बदलापूरचे नागरिक रस्त्यावर उतरले, स्टेशनवर तुफान राडा

Badlapur Crime: बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर शहरातील वातावरण प्रचंड तापले आहे. मंगळवारी सकाळपासून बदलापूरमध्ये पालक आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी संतप्त नागरिकांनी मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेवर मोर्चा काढला. मात्र, तीन तास उलटून शाळा प्रशासनाकडून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कोणीही पुढे आली नाही. त्यावेळी आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर  रेल्वे स्थानकाकडे वळवत मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली. गेल्या काही तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन अडकून पडल्या आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना रेल्वे रुळांवरुन हटवण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलिसांचे एक पथक आंदोलकांना हटवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार करण्याच्या तयारीत होते. मात्र, रेल्वे पोलिसांची तुकडी आपल्या दिशेने येताना दिसताच आंदोलकांनी तुफान दगडांचा मारा केला. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या पथकाने माघार घेत आंदोलकांशी पुन्हा चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला.

बदलापूर स्थानकात काहीवेळ दगडफेक झाल्यानंतर आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर ठिय्या देऊन बसले आहेत. तर दुसरीकडे या आंदोलनाचे लोण शहरभरात पसरले आहे. आज सकाळीच बदलापूर बंदची (Badlapur Crime) हाक देण्यात आली होती. मात्र, बदलापूर स्थानकातील आंदोलन तापल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस पथकाकडून शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रुट मार्च काढला जात आहे. आंदोलनाचे लोण आणखी पसरु नये, यासाठी बदलापूरमध्ये मोठ्याप्रमाणावर पोलीस फौजफाटा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे बदलापूर शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. 

बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या आंदोलनाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळत आहे. रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे हे घटनास्थळी हजर आहेत. सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आम्हाला तुमच्या भावना समजतात. मात्र, तुमच्या चेंगराचेंगरीत एखाद्याला दुखापत होऊ शकते. त्यामुळे रेल्वे रुळांवरुन बाजूला व्हा, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, आंदोलक माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला  शाळेसमोरच जाळू, अशी हिंसक भाषा आंदोलक करत आहेत. शाळेच्या परिसरातील असलेल्या आंदोलकांनी शाळेतही तोडफोड केली आहे. या आंदोलकांना काबूत आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे बदलापूरमध्ये सध्या कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

आणखी वाचा

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget