एक्स्प्लोर

300 जणांवर गुन्हा दाखल, 40 जणांना अटक; बदलापुरातील आंदोलकांवर कारवाई, आरोपीची पोलीस कोठडीही वाढवली

Badlapur Crime: बदलापुरात मंगळवारी झालेल्या तीव्र आंदोलनानंतर आज तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बदलापुरात इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे.

Badlapur School Crime Case : बदलापूर : दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे ट्रॅक रोखून धरला. शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढलं. सध्या बदलापुरात तणावपूर्व शांतत आहे. बदलापुरात इंटरनेट बंद करण्यात आलं असून अद्याप जमावबंदी लागू आहे. बदलापुरातील तीव्र आंदोलनाची दखल जवळपास संपूर्ण देशानं घेतली. नराधमाला फाशी द्या, या एकाच मागणीसाठी सर्वसामान्य रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता या घटनेत 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे.

बदलापुरात (Badlapur News) मंगळवारी झालेल्या तीव्र आंदोलनानंतर आज तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बदलापुरात इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे.  अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येत असल्यातं ठाणे पोलिसांनी सांगितलं. तसेच, आंदोलन झाल्यानंतर आज रेल्वे वाहतुकीबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिस्थिती सामान्य आहे. रेल्वेची वाहतूकही सामान्य आहे. आता कोणतंही कलम लावलेलं नाही. दरम्यान, अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा काही दिवस बंद राहणार असल्याचं मात्र त्यांनी स्पष्ट केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालवाडीच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना 16 ऑगस्ट रोजी एका मुलीनं आपल्या पालकांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी अक्षय शिंदे याला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.

आरोपीच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ

अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. या दरम्यान, मीडियाला कोर्टात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपलेली. आरोपीला व्हिसीद्वारे आज कोर्टात हजर करण्यात आलं. 16 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर 17 तारखेला आरोपीला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता कोर्टानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

चिमुकल्यांसोबत 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय? 

बदलापूर प्रकरणाचा रोष अवघ्या देशभरात पोहोचला. अवघ्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांना नराधमानं ओरबाडलं होतं. बदलापुरातील एका नामांकीत शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केलं. यातील आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, ज्यावेळी प्रकार उघडकीस आला त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणाची दखल न घेता, मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवलं. याप्रकरणी तीव्र आंदोलन झाल्यानंतर या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. तसेच, शाळा प्रशासनानं माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचं निलंबन करण्यात आलं आहे. बदलापुरात चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं. शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. 

समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली. बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला. दरम्यान, शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. 

12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत, असं चिमुकलीचं वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की, तिच्यासोबत काय घडलंय... सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या पैशातून व्यवसाय, 10 दिवसात 10 हजार कमावले100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 सप्टेंबर 2024ABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Ajit Pawar: अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
Embed widget