एक्स्प्लोर

बदलापूर प्रकरणातील मुलींवर 15 दिवसांत अनेकदा अत्याचार, सरकारच्या समितीचा धक्कादायक निष्कर्ष!

Badlapur Minor Abuse : बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

ठाणे : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Badlapur Minor Abuse Case) झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान, या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्रभर निदर्शन करण्यात येत आहे. असे असतानाच आता बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. या समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार बदलापूरमधील त्या अल्पवयीन मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार होते. 

अहवालात नेमके काय?

1) त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे.

2) गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता.

3) 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली.

4) त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्रा-शिवाय सहज प्रवेश होता.

5) त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे.

6) हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जातील.

7) शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.

8) तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.

9) पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले.

एसआयटीने नोंदवले 17 जणांचे जबाब

बदलापूर प्रकरणात आतापर्यंत SIT ने 17 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात शाळेच्या 10 शिक्षक, 5 सफाई कर्मचारी, 2 लिपिक यांचा समावेश आहे. जबाब नोंदवण्यात आलेल्या शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून तीन जणांचा निष्काळजीपणा समोर येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात शाळेच्या मुख्यध्यापिका आणि दोन ट्रस्टींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना प्रथम लिपीक यांना समजली होती. लिपिकांनी याबाबत मुख्यध्यापिकांना होते. मात्र घटना कळूनसुद्धा पुढे याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे.

बदलापूर अत्याचाराचे नेमके प्रकरण काय आहे? 

बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. सकाळी चालू झालेले हे आंदोलन संध्याकाळापर्यंत चालले होते. या प्रकरणातील आरोपील आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे घृणास्पद कृत्य केले होते. त्याच्यावर लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.  

हेही वाचा :

सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित

उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात, महाराष्ट्र अशांत करण्याचे षडयंत्र सुरु, बदलापूर घटनेवरुन चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget