एक्स्प्लोर

Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे आरोपी उत्तर प्रदेशातील; हत्येमागे सलमान खान कनेक्शन, बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय

Baba Siddique Shot Dead  :  मारेकऱ्यांमधील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून एक जण फरार आहे. या मारेकऱ्यांचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी सहा गोळ्या झाडल्या असून एक आरोपी हा हरियाणातील आहे तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये बाबा सिद्दिकी यांच्या जागेवरच मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघा अज्ञातांनी सहा गोळ्या झाडल्या.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय  

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. यामागे एका मोठ्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावरही गोळीबार केला होता.

सलमान खान कनेक्शन असल्याचा संशय 

बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे निकटवर्तीय असून त्यांनी सलमानला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांच्यावर बिश्नोई गँगने गोळीबार केला आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

पंधरा दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. तरीही त्यांची हत्या झाली. दसऱ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

खेरवाडी परिसरात या दरम्यान फटाके वाजवण्यात येत होते. त्याचवेळी आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी पळून जात होते. त्यापैकी दोघांना जमावाने पकडले तर एक आरोपी पळून गेला. पोलिस त्याच्या मागावर आहेत. 

ही बातमी वाचा:

            

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget