एक्स्प्लोर

Aurangabad Crime News : तरुणीने मित्राच्या मदतीने दिवसाढवळ्या व्यापाराला लुटलं

Aurangabad Crime News in Marathi : औरंगाबादेत जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला एका तरुणीने आपल्या मित्रांच्या मदतीने लुबाडल्याचं प्रकरण समोर आले आहे.

Aurangabad Crime News in Marathi : औरंगाबादेत जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला एका तरुणीने आपल्या मित्रांच्या मदतीने लुबाडल्याचं प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्याला त्याच्याच कार्यालयात जाऊन लुटले आहे. औरंगाबादमधील समर्थ नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. तरूणीसह दोन्ही आरोपी विरोधात क्रांतीचौक पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात तिघांनाही बेड्या ठोकल्या आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव रचना निंभोरे असे आहे. 25 वर्षीय रचना हिने आपल्या दोन मित्रासह व्यावसायिकाला कार्यालयात जाऊन लुटले. या तिघांनी  कार्यालयात घुसून व्यावसायिकाला मारहाण करीत  तब्बल 13 तोळे सोने ओरबाडून पोबारा केला. धक्कादायक बाब म्हणजे, या तिघांनी दिवसा ढवळ्या व्यापाऱ्याला मारहाण करत लुबाडले. 

औरंगाबाद शहरातील समर्थ नगर परिसरात अशोक पाटील नावाच्या 66 वर्षीय व्यक्तीचं ऑफिस आहे. गेल्या काही दिवसांपासून रचना त्या व्यापाऱ्याला काही प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे असं सांगून त्यांच्याशी लगट करत होती. बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान ती ऑफिसमध्ये आली. त्यानंतर काही वेळातच तिचे दोन मित्रही ऑफिसमध्ये पोचले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिकाला मारहाण केली अन् लुबाडले. 

व्यापाऱ्याने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांची सुत्रे फिरली. पोलिसांसमोर या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान होतं. पण आरोपी सराईत नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं.  व्यावसायिकाला फोन केलेल्या नंबरवरुन पोलिसांनी आरोपी तरुणाचा शोध घेतला आणि बेड्या ठोकल्या. तरुणीच चौकशी केली असता दोन्ही सहकऱ्याची नावेही तिने सांगितली. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  दरम्यान, या प्रकरणाचा शोध पोलिस घेत आहेत. त्याशिवा या तिघांनी यापूर्वी अशा प्रकारच्या काही घटना केल्या आहेत का? याचा क्रांतीचौक पोलिस शोध घेत आहेत.  

महत्वाच्या बातम्या :
Holi: होळी आधीच मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधींच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक
Aurangabad : बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकले  

 मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget