एक्स्प्लोर

Aurangabad : बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकले 

Aurangabad Crime : बँकेतल्या एकाच लॉकरमध्ये इतकं मोठं घबाड सापडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही (ACB) डोळे चकाकलेत. 

Aurangabad Crime : औरंगाबादमधील बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याकडे लाखोंच रुपयांचं घबाड सापडलंय. बँकेतल्या एकाच लॉकरमध्ये इतकं मोठं घबाड सापडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही (ACB) डोळे चकाकलेत. 

अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड!
बांधकाम विभागातील  लाचखोर अभियंत्याचं नाव संजय राजाराम पाटील आहे. औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखाची लाच मागितली होती. त्यात तडजोड होऊन चाळीस हजाराचा पहिला हप्ता घेताना एसीबीने रंगेहात पकडले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे पहिल्याच झडतीत कोट्यवधींचे घबाड सापडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लाचलुचपत विभागाकडून अटक झाल्यानंतर त्याची घरझडती घेतल्यानंतर एक लॉकर समोर आले. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लॉकर उघडलं आणि पाचशे आणि दोन हजाराच्या बंडल भरलेलं लॉकर पाहून अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. त्या एकाच लॉकरमध्ये  85 तोळे सोन्याचे दागिने आणि 26 लाख 4 हजार 500 रुपयांची रोकड सापडली आहे.

त्या मालमत्तेची खुली चौकशी होणार
ACB अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे केवळ एका लॉकरमधले आहे. आणखी किती लॉकरमध्ये आहेत? किती बँकेत खाती आहेत?,  घरात किती रोकड लपवून ठेवलेली आहे आणि कुठे कुठे जमीन प्लॉट आणि घराची मालमत्ता आहे याची तपासणी सध्या सुरू आहे.लाचखोर संजय पाटीलने लाचेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता वर्तविली जातेय. शिवाय शेती, फ्लॅट, प्लॉट, बंगला यामध्येसुद्धा गुंतवणूक केल्याची शक्यता असल्याने त्या मालमत्तेची खुली चौकशी होणार आहे. त्या चौकशीनंतर आणखी किती घबाड हाताला लागेल हे आतातरी सांगणं कठीण आहे. मात्र पहिल्याच झडतीत मोठं घबाड हाती लागल्यानंतर या लाचखोर अधिकार्‍याकडे मोठी माया असेल अशी अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Beed: सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लाच प्रकरणात अटक; पदोन्नतीच्या आनंदावर विरजण

नामांकीत ज्वेलर्सकडून ग्राहकांना दीड कोटीचा गंडा; मासिक भिसी योजनेत पैसे गुंतवणूक करून घेत 24 ग्राहकांना गंडा

Ambernath Shocking: अंबरनाथ येथील धक्कादायक प्रकार! किडनी विकण्याचं आमिष दाखवत महिलेला 8 लाखांचा गंडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget