एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: शक्तिवर्धक गोळ्या खाऊन अशोक खरातला अर्धांग वायूचा आलेला झटका; एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत बदल, तपासात नवीन खुलासा

Ashok Kharat Case Nashik Crime News: भोंदूबाबा अशोक खरातबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यानं अशोक खरात बेजार झाला होता.

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलं आहे. एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

भोंदूबाबा अशोक खरातबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यानं अशोक खरात बेजार झाला होता. दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर अशोक खरातने शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार करून जीव वाचवला. आजही एका हाताची हालचाल मर्यादित झाली होती. भुवईत बदल दिसून येत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच उत्तेजक औषध घेणं अशोक खरातला जीवावर बेतलं असतं. अशोक खरातच्या तपासातून महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर- (Ashok Kharat HIV Test)

पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह (Ashok Kharat HIV Test) आली आहे. भविष्य सांगण्याचा बहाण्याने अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे, नाशिक पोलिसांत दाखल झालेल्या 8 गुन्ह्या पैकी 7 गुन्हे महिला अत्याचार संदर्भात आहे. गुन्हा दाखल केलेल्या महिला व्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाही. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याने पिढीत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे  टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्हाशी सबंधीत सर्व बाजूचा विचार करून तपास करत आहेत. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

मोबाईलमधील महत्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागणार- (Ashok Kharat Case)

अशोक खरातचा मोबाईल तपास पथकाने ताब्यात घेत मोबाईलमधील डेटा रिकव्हर करत महत्वाचे पुरावे पथकाला मिळणार असल्याची माहिती आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरातची महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. SIT कडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील SIT ने जप्त केला आहे. 

अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे.  शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?, रिपोर्ट समोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात ज्या केबिनमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करायचा, तिथे SIT चं पथक पोहोचलं; शटर उघडताच काय दिसलं?, PHOTO

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget