Gondia News : होर्डींगने घेतला आणखी एकाचा बळी; संतप्त नागरिकांकडून थेट नगर परिषदेला घेराव, नेमकं काय घडलं?
Gondia News : गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिर चौपाटी जवळील विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना विद्युत करंट लागून एका तरुणाचा मृत्यू झालाय.
Gondia News गोंदिया : मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर (Ghatkopar Hoarding Accident) त्याचे पडसाद राज्यासह देशातही उमटतान दिसले. ही दुर्घटना इतकी भीषण होती की त्याची दाहकता अद्याप सऱ्यांपूढे आहे.या दुर्घटनेनंतर सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून राज्यातील अनधिकृत होर्डींगवर कारवाईचा सपाटा लावण्यात आला. असे असले तरी गोंदिया शहरात (Gondia News) या होर्डींगने आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे.
गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिर चौपाटी जवळील विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना विद्युत करंट लागून एका तरुणाचा मृत्यू झालाय. छोटा गोंदिया येथील रहिवासी असलेला आकाश नागरीकर (वय 25 वर्ष )असे या मृत तरुणाचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर या तरुणाला नजीकच्या केटीएस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटने पुन्हा एकदा अवैध होर्डींग चर्चेत आले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
होर्डींग काढत असतांना विद्युत करंट लागल्याने तरुणाचा मृत्यू
गोंदिया शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, व्यापारी वर्ग, राजकारणी यांचे होर्डिंग नगरपरिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जातात. यासंदर्भात नगरपरिषदेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांसमोर देखील अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठवलाय. मात्र, केवळ प्रशासनाच्या दुलर्क्षामुळे शहरात आज अशी ही दुर्दैवी घटना घडलीय. ज्यामध्ये छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.
या प्रकरणामुळे संतप्त नागरिकांनी गोंदिया शहरातील प्रभारी मुख्याधिकारी यांच्या दालनात घेराव घालत आंदोलन केले. तर मृतकाच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. त्यामुळे आता संबंधित प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चाकूने वार करत एकाची निर्घृण हत्या
अज्ञात आरोपींनी मध्यरात्री एका 17 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली आहे. उज्वल मेश्राम (वय 17 वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा गोंदिया शहरातीलच रहिवासी असून काल, 18 जून रोजी रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला.
यात उज्वल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली असून गोंदिया शहर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून दोन चाकू मिळाले आहेत. तर या हत्येच्या घटनेने परिसरात एकच दहशत पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या