एक्स्प्लोर

VIDEO : एखाद्याचा CDR काढणे हा गुन्हाच, तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते; अंजली दमानियांच्या सीडीआर प्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी काय म्हणाले? 

Ashok Kharat : एखाद्याचा मोबाईल CDR अनधिकृतपणे बाहेर काढणे हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग असून त्यासाठी संबंधित व्यक्ती, मोबाईल कंपनीसुद्धा दोषी ठरू शकते असं मत निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अशोक खरातचा मोबाईल सीडीआर (Ashok Kharat Mobile CDR) बाहेर काढला आणि खरातशी कोण कोण संपर्कात होतं याची माहिती जगजाहीर केली. त्यानंतर त्यावरून मोठा गोंधळ सुरू झाला. अंजली दमानिया यांच्याकडे हा सीडीआर (Mobile CDR) कुठून आला, याचा तपास करण्याची मागणी केली गेली. परंतु अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचा अनधिकृतपणे सीडीआर काढणे हा गुन्हाच असल्याचं मत निवृत्त पोलीस अधिकारी खुशालचंद बाहेती यांनी स्पष्ट केलं.

एखाद्याच्या फोनचे सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवणं हा गुन्हा आहे, तो त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे असं स्पष्ट मत निवृत्त पोलीस अधिकारी खुशालचंद बाहेती यांनी मांडलं आहे. भारतीय तार कायदा कलम 25 नुसार तो गुन्हा असून त्याबद्दल संबंधिताला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर मोबाईल कंपनीसुद्धा अशा प्रकारामध्ये दोषी असते असं ते म्हणाले. 

Mobile CDR Case : वैयक्तिक स्वातंत्र्याचं उल्लंघन

निवृत्त पोलीस अधिकारी खुशालचंद बाहेती म्हणाले की, एखाद्याचा सीडीआर मिळवणे, अशा प्रकारची वैयक्तिक माहिती मिळवणे हे घटनेतील अनुच्छेद 21 प्रमाणे स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते. त्यामुळे हे कुणालाही अनधिकृतपणे मिळवता येत नाही. एखाद्याचा अनधिकृतपणे सीडीआर मिळवणे म्हणजे भारतीय तार कायदा कलम 25 नुसार तो गुन्हा असून त्याबद्दल संबंधिताला 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 

सीडीआर मिळाल्यानंतर त्याच्या गोपनियतेचा भंग करणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. सीडीआर काढणे हा एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. त्यासाठी तक्रार करता येते आणि त्यावर नुकसान भरपाईचा दावाही करता येतो, असंही खुशालचंद बाहेती यांनी म्हटलं. 

Ashok Kharat Mobile CDR : दमानिया यांच्याकडून सीडीआर जाहीर

अंजली दमानिया यांनी काही सीडीआर समोर आणले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरातसोबत झालेल्या संवादाचे डिटेल्स त्यांनी दिले. अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर त्यांच्याकडे नेमका सीडीआर आला तरी कुठून, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.  त्यानंतर यावरून होणारे सर्व आरोप अंजली दमानियांनी फेटाळले असून 'नॉनसेन्स' म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर टीका केली.  

मी अनधिकृत गोष्टी मागत नाही, माझ्याकडे माहिती आली ती यंत्रणांना पाठवली.  मला सीडीआर कसे मिळाले त्याची जरुर चौकशी करा, असं प्रतिआव्हानही अंजली दमानियांनी केलं.  यावेळी अंजली दमानिया यांना अश्रूही अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget