एक्स्प्लोर

Nagpur Crime: अस्तित्वात नसलेल्या कंपनीची भागिदारी विकली, अमरावतीच्या महिलेने 6 लाख उकळले

सखोल चौकशी केली असता उपरोक्त नावाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समजले. त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली मात्र, आरोपीने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

नागपूर: अमरावतीच्या एका महिलेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कंपनीत भागीदारीच्या नावावर नागपुरातील एका व्यवसायीकाची 6 लाख रुपयांनी फसवणूक केली. ही घटना धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला आहे. स्नेहनगर परिसरात राहणारे सतिश रेडपाडे (53) हे व्यवसायी आहेत. त्यांची समर्थनगर, अजनी येथे इनोव्हेटीव्ह बायो सायन्स या नावाची घनकचरा व्यवस्थापन कंपनी आहे. 

पाच वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन या विषयावर अमरावतीला मिटींग होती. या मिटींगमध्ये रेहपाडे सहभागी झाले. विषयाचे गांर्भीय लक्षात घेता अनेक व्यवसायी आणि सामाजिक कार्यकर्तेसुध्दा उपस्थित होते. याच परिषदेला अमरावती येथील आरोपी मीना देशमुख (50) ही सुध्दा सहभागी झाली होती. बैठक आटोपल्यानंतर फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. आरोपीने विजयालक्ष्मी ऑर्गनीक कंपोस्ट अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो नेवार या कंपनीची मालक असल्याचे फिर्यादीला सांगितले. तसेच घनकचरा संबधीत कामाविषयी सखोल चर्चा केली.

आर्थिक भागीदार बनण्याचा दिला प्रस्ताव

दरम्यान 2017 मध्ये आरोपी ही पतीसह फिर्यादीच्या धंतोली येथील कार्यालयात आली. आमच्याकडे अचलपूर येथील घनकचरा व्यवस्थापनाचा 30 लाख रुपयांचा प्रकल्प असल्याची माहिती दिली आणि त्यात आर्थिक भागीदार होण्याचा प्रस्ताव रेहपाडे यांना दिला. रेहपाडे तिच्या जाळ्यात अडकले. आर्थिक भागीदारीचा करारनामा सुध्दा करण्यात आला होता. रेहपाडे यांनी 26 मार्च 2018 पर्यंत वेगवेगळ्या तारखेत आरटीजीएसव्दारे मीनाच्या खात्यात 6 लाख रुपये जमा केले.

आरोपीची कोणतीही कंपनी नसल्याचे समजले

काही दिवसांनी फिर्यादीने प्रकल्पाच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीला शंका आली. त्यांनी सखोल चौकशी केली असता उपरोक्त नावाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समजले. त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली मात्र, आरोपीने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. या प्रकरणी फिर्यादीने न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget