एक्स्प्लोर

Amravati Accident : एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट; अमरावती कार अपघात प्रकरणी तपासाला वेग, माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर

Amravati Accident : अमरावतीत कार अपघात प्रकरणी आता अमरावती शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. आज रविवारच्या सकाळी एबीपी माझावर बातमी प्रसारित होताच पोलीसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान केले आहे.

Amravati News अमरावतीअमरावतीत कार अपघात प्रकरणी (Amravati Accident) आता अमरावती शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. आज रविवारच्या सकाळी एबीपी माझाने बातमी प्रसारित होताच पोलीसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान केले असून या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथक तयार करण्यात आले आहेत. सोबतच या अपघातात धडक देणाऱ्या त्या वाहनाची आणि त्यातील व्यक्तींची माहिती देणाऱ्याला 20 हजार रुपयांचे  बक्षीस देखील पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.

एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट

पुण्यातील हिट अँड रन कार अपघाताची घटना (Porsche Car Accident) संपूर्ण देशभर गाजत असतानाच अमरावती शहरात देखील अशीच एक घटना घडली होती. यात अमरावतीच्या (Amravati News) गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मे च्या दुपारी संमती कॉलनी परिसरात एका भरधाव कार चालकाने भर दिवसा एका इसमाला जोरदार धडक दिली. त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या या इसमाला तसेच सोडून कार चालकाने पळ काढला होता. हा अपघात इतका भीषण होता की यात या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना होऊन आज 23 दिवस उलटले असले तरी अद्यापही या कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही.

आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर

एकीकडे राज्यात पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे समाजमन हेलावून गेलं असताना अमरावतीच्या या घटनेचेही स्मरण अमरावतीकरांना होत आहे. परिणामी, यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. अशातच एबीपी माझाने या अपघाताची बातमी आज प्रसारित केली असता, अमरावती पोलिसांच्या कारवाईला वेग आले आहे. परिणामी पोलिसांनी 4 पथके तयार करून यातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

23 दिवसानंतरही आरोपी फरारच!

अमरावती शहरातील किशोर नगर येथील रहिवासी भीमसेन वाहने हे कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून आपल्या दुचाकी वाहनाने जात होते. दरम्यान, एका भरधाव इंडिका कारने त्यांना जोरदार धडक देत उडविले. त्यानंतर या कारमधील तरुण बाहेर आले आणि परत कारमध्ये बसून निघून गेले. यावेळी त्यांनी जखमी भीमसेन यांना रुग्णालयात दाखल करण्याची देखील तसदी न घेता घटनास्थळावरून निघून गेले. काही वेळानंतर परिसरातील नागरिकांनी भीमसेन वाहने यांना रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा 15 मे रोजी उपचारअंती मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. त्यानंतर या संपूर्ण घटनेची तक्रार गाडगे नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र 23 दिवसानंतरही पोलिसांनी अद्यापही या प्रकरणातील आरोपींना अटक केलेली नाही. यामुळे कुटुंबीयांमध्ये आणि शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Embed widget