एक्स्प्लोर

Amravati News : घोरपडींची विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला; चार घोरपडींसह मारेकरी तब्यात 

Amravati: अमरावतीच्या वडाळी परिसरात घोरपडींची राजरोस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, घोरपडींची विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.

Amravati News अमरावती : अमरावतीच्या वडाळी परिसरात घोरपडींची (Bengal Monitor) राजरोस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, वडाळी येथील पारधी बेड्यावर विक्रीसाठी काही घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ही माहिती मिळातच ही विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वनविभाग आणि पोलिसांच्या पथकावर येथील समूहाकडून प्राणघातक हल्ल्या (Crime News) करण्यात आलाय. यात वन विभागाचे दोन वनमजूर जखमी झाले असून पोलीस पथकाने हल्ला परतवून लावत चार घोरपडी जप्त केल्या आहेत. तसेच यातील एका संशयित आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही थरारक घटना घडली असून या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

चार घोरपडींसह मारेकरी तब्यात

राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक भागात पावसाळ्याच्या प्रारंभी घोरपडींची छुप्प्या पद्धतीने विक्री काही समूहाकडून केली जाते. अमरावतीच्या वडाळी येथील पारधी बेड्यावरही  विक्रीसाठी घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. दरम्यान, वन विभागाने तात्काळ पोलिसांच्या मदतीने पारधी बेडयावर धाड टाकली. त्यामुळे बिथरलेल्या पारधी समूहाने वन विभाग आणि पोलीस विभागाच्या पथकावर हल्ला चढवला. या घटनेत एक वनमजूर जखमी झालाय. तर या घटनेतील एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर  इतर काही लोक पळुन गेल्याची माहिती आहे. वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलीय. तर या घटनेचा पुढील तपास सध्या वन विभाग आणि पोलीस करत आहेत.

भंडारा - गोंदियात सारस पक्षांची संख्या घटली

महाराष्ट्रातील सारस पक्षी केवळ भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात आढळून येतात. मात्र, सारस पक्षांची कमी होत चाललेली संख्या लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करून उपाययोजना करण्याचे निर्देश शासन आणि प्रशासनाला दिले होते. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात नुकतीच सारस पक्षांची गणना करण्यात आली. यात मागील वर्षीच्या तुलनेत या दोन्ही जिल्ह्यात सारस पक्षांची संख्या कमी झाल्याची धक्कादायक माहिती या मोजनीतून समोर आली आहे. 

मागील वर्षी भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात चार तर, मोहाडी तालुक्यात तीन असे सात सारस पक्षी आढळून आले होते. तर, गोंदिया जिल्ह्यात 31 सारस पक्षी होते. मात्र, यावर्षीच्या मोजणीत भंडारा जिल्ह्यात केवळ चार पक्षी आढळून आलेत. तर, गोंदिया जिल्ह्यात 28 सारस पक्षी आढळले असून तीन सारस पक्षी कमी झाल्याचं आढळून आलेत. राज्यात आता केवळ 32 सारस असल्याची नोंद झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत संख्या कमी झालेली आहे. एकीकडं सारस पक्षाच्या संवर्धनासाठी दोन्ही जिल्ह्यात समिती असतानाही सारस पक्षांची संख्या कमी झाल्यानं, येथील सारस पक्षी त्यांचं अधिवासाचा भाग सोडून अन्य ठिकाणी गेलेत का? किंवा त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे. 

मागील पाच वर्षातील सारस पक्षांची संख्या

भंडारा जिल्हा

  •  2020 - 02
  •  2021 - 02
  • 2022 - 03
  •  2023 - 07
  • 2024 - 04

गोंदिया जिल्हा

  • 2020 - 45
  •  2021 - 39
  • 2022 - 34
  •  2023 - 31
  • 2024 - 28

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Embed widget