Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालेल्या पोलीसांच्या गाडीत काय सापडलं?; फॉरेन्सिक टीमकडून ती वस्तू हस्तगत!
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास वरीष्ठ डीसीपी पराग मनेरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. सदर खळबळजनक घटनेनंतर सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वरीष्ठ डीसीपी पराग मनेरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ज्या पोलिसांच्या गाडीत अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) एन्काऊंटर झाला त्याची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ठाणे पोलिस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेडग्राऊडमध्ये ठेवण्यात आली आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमला या पोलीस वाहनातून चार बुलेट शेल सापडले आहेत. अक्षय शिंदेने एकुण तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी एपीआय नीलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर दोन गोळी मिस फायर झाल्या होत्या. तर एक गोळी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली असून त्यात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला.
पोलीस वाहनात काय घडलं?
सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून घसघशीत इनाम जाहीर-
मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी सदर घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने ओरोपीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. मी याआधी म्हटलं होतं, की आमचं सरकार असतं तर एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
संबंधित बातमी:
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?