Akola Crime News : धक्कादायक! वाहनाचा कट लागला म्हणून रागाच्या भरात थेट तरुणाला संपवलं; अकोल्यातील घटना
Akola Crime News: वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात ही घटना घडली आहे.
Akola Crime News अकोला : वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील ( Akola Crime News) हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल (दि. 16) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. देवानंद उत्तम तायडे (28) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. लाठ्या-काठ्यानी देवानंदवर हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी ( Akola Police) तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून मारेकरांचा शोध आणि पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे.
शुल्लक कारणावरुन हत्या
हिवरखेड येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मृत देवानंद उत्तम तायडे हा दुचाकीनं घरी जात होता. दरम्यान, वाटेत उभ्या असलेल्या वाहनाला त्याच्या वाहनाचा कट लागला. यावरून काही अज्ञात व्यक्ती आणि देवानंद यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी देवानंदला अश्लील शिव्यागाळही केली. परिणामी शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातून रागाच्या भरात चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठिने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर या मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
फरार आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून सध्या देवानंदच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. लवकरच देवानंदच्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिली. दरम्यान आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमण्यात आले असल्याचे देखील पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी सांगितले. मात्र अगदी शुल्लक कारणावरुन झालेल्या हत्येच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आपल्या मुलाची हत्या झाल्याचं समजताच देवानंदच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
इतर महत्वाच्या बातम्या