एक्स्प्लोर

Akola Crime : अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्यानंच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, आरोपी शिवम दुबेवर गुन्हा दाखल

Akola Police Rape Case : पोलीस कर्मचाऱ्याने सहकारी मित्राच्या पत्नीशी फेसबुकवरून मैत्री केली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.

अकोला : अकोल्यात पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवम दुबे असं या आरोपी पोलीस शिपायाचं नाव आहे. तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. अकोट शहर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहकारी मित्राच्या पत्नीसोबत फेसबुकवरून मैत्री करीत त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर (Akola Police Rape Case) शिवम दुबे फरार झाला आहे.

'सद्रक्षणाय, खलनिग्रहनाय' असं ब्रीद असलेल्या पोलीस दलांत अकोल्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्याच पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या आरोपानं खळबळ उडाली आहे. यासोबतच पीडितेला आरोपी पोलिसानं सातत्याने ब्लॅकमेल देखील केल्याचं देखील समोर आलं आहे. शिवम दुबे असं या पोलीस पोलीस शिपायाचं नाव असून असा तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. 

फेसबुकवर मैत्री आणि ओळख (Akola Police Rape Case) 

आधी शिवमनं पीड़ित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. याच ओळख अन प्रेमाचा फायदा घेत तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याच तक्रारीत नमूद आहे. दीर्घ काळानंतर आरोपी ब्लॅकमेल करायला लागल्यानं पिडीत महिलेने अकोट शहर पोलिसांत याप्रकरणी तक्रार केली. यानंतर आरोपी दुबेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

शिवम दुबेनं केला मैत्री आणि मित्राचा विश्वासघात 

अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे हा कार्यरत होता, यादरम्यान त्याची सोबतच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांशी चांगली मैत्री झाली. यातूनच शिवमचं 'त्या' मित्र झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. याचदरम्यान त्याची वाईट नजर मित्राच्या पत्नीवर पडली. शिवमनं आपल्या या मित्राच्या पत्नीला 'फेसबुक'वर 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवली. तिने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. 

त्यानंतर शिवम आणि तिच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. यातच शिवमने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतरानं शिवमनं मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. तिने मोठ्या हिमतीने हा प्रकार पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून शिवमवर आकोट शहर पोलीस ठाण्यात 526/2023 कलम 354, 354 (अ), 354 (ड), 376(1) (ए), 376(2) (एन), 376 (3) या कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक योगिता ठाकरे करीत आहेत.

पीडितेवर अकोला-अमरावतीत केलेत अत्याचार 

तक्रारीत सर्व घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. शिवमनं पीड़ित महिलेसोबत फेसबुकदवारे मैत्री संपादन करून प्रेमसंबंध केले. त्यातून शारिरीक संबंध ठेवून भाबडेपणाचा फायदा घेत ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने दोन ते तीनदा शारिरीक संबंध केले अशा तक्रारीवरुन सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान शिवमनं पंडित विवाहित महिलेवर तिच्या राहत्या घरी तसेच अमरावती येथे नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील पीडित महिलेवर शिवमनं इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान अकोट पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवम हा फरार झाला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

अद्याप आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाहीय. आरोपी पोलीस खात्यात असल्याने पोलीस दलाचे बदनामी होत असल्याने पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगलं आहे. या प्रकरणाची अकोल्याच्या पोलीस दलात मोठी चर्चा असून यावरून मोठी खळबळ उडाली आहे. 

ही बातमी वाचा: 

 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak: पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?
पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?
Vikas Lawande : शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक, शाई फेकणारे संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्यासीला फाशी, लवांडेंचं टीकास्त्र
शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक, शाई फेकणारे संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्यासीला फाशी, लवांडेंचं टीकास्त्र
Bandra Railway Station Demolition: वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक
वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक
NEET Eaxm Paper Leak: ना इंटरनेट, ना मोबाइल, ना खिडक्या, सुरक्षित ठिकाण; तरी सेट केलेला पेपर खोलीतून बाहेर कसा आला? धक्कादायक पर्दाफाश
ना इंटरनेट, ना मोबाइल, ना खिडक्या, सुरक्षित ठिकाण; तरी सेट केलेला पेपर खोलीतून बाहेर कसा आला? धक्कादायक पर्दाफाश

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Kriti Kharbanda: 'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सरकारचा भाग होणार; विजय यांच्या मंत्रिमंडळात आज दोन मंत्र्यांचा शपथविधी, व्हीसीके-आययूएमएललाही स्थान मिळण्याची शक्यता
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
मराठी पोराच्या कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियामध्ये अक्षरशः धुमाकूळ; देशातील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही तासात मागे टाकत केला इन्स्टावर फाॅलोअर्सचा विक्रम, तरुणाईचा उद्रेक असल्याची चर्चा
Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
Andekar vs Komkar : आधी नातू, मग आरोपीचा भाऊ अन् आता...; आंदेकर प्रकरणातील बदल्याची मालिका थांबेना! पुण्यात टोळीयुद्धाचे रक्तरंजित सत्र; काय आहे पार्श्वभूमी?
आधी नातू, मग आरोपीचा भाऊ अन् आता...; आंदेकर प्रकरणातील बदल्याची मालिका थांबेना! पुण्यात टोळीयुद्धाचे रक्तरंजित सत्र; काय आहे पार्श्वभूमी?
Embed widget