एक्स्प्लोर

धक्कादायक! हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, मृत्यूपूर्वीचं पत्र पोलिसांच्या हाती

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहातामध्ये धक्कादायक घटना गडली आहे. हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेनं विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहातामध्ये धक्कादायक घटना गडली आहे. हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेनं विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रिया शुभम ढगे ( वय 23 ) अस मृत विवाहितेचं नाव आहे. घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सासरकडून विवाहितेचा सतत छळ सुरु होता. या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे ( सर्व राहणार को-हाळे , तालुका - राहाता , अहिल्यानगर ) यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करम्यात आली आहे. तिघांनांही पोलिसांनी अटक केली आहे. 

2024 ते 2026 दरम्यान विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु असल्याची माहिती मिळत आहे. छळ सहन न झाल्याने महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सगळं सासुमुळं झालं, नवऱ्यानं माझ्यावर कधीच प्रेम केल नाही, मृत्यूपूर्वी लिहेलं पत्र पोलिसांच्या हाती दरम्यान, मृत्यूपूर्वी विवाहितेनं एक पत्र लिहलं आहे. यामध्ये तिने कुटुंबातील व्यक्तींवर आरोप केले आहेत.  तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता मला काहीच नको. मी खूप सहन केलं आहे. मला माझी श्रेया माझा जवळ नाही. तिला खुप मिस करते पण ती माझ्याकडे येणार नाही.  माझा नवरा शुभम, मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, पण त्याने कधीच माझ्यावर तसं प्रेम केलं नाही. त्याचं प्रेम फक्त त्याच्या कुटुंबावर आहे. आज सगळं काही माझ्या सासूमुळे झालं आहे. त्यांना फक्त आमचं भांडण कसं होईल हेच पाहिजे होतं. ताई, श्रेयाची काळजी घे. श्रेयाला मी तुझ्यावर सोपवून जाते. आज जगामध्ये मी नाही, पण मी शुभमवर प्रेम करत राहील. माझी श्रेया मला “मम्मी” म्हणायची. एक महिना झाला तिला पाहिलंही नाही. खुप मिस करतेय श्रेयाला असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. सॉरी श्रेया… तुझ्यासाठी मी काहीच करू शकले नाही. आज सगळे बोलत आहेत की मी चूकी केली आहे, पण मी चोरी नाही केली. अक्काचे पैसेही नाही घेतले.मला नोकरी करायची होती, पण घरचे नाही बोलले. फक्त आता कोणालाही टेंशन नाही द्यायचे.
शुभमला सांगा, करा मजा आता मी तुमच्या लाईफ मधून गेले आहे. माझी शेवटची एकच इच्छा एकच आहे. माझ्या श्रेयाचा सांभाळ कर ताई. आता मला काहीच नको आहे. सॉरी…Love you Shreya… असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget