एक्स्प्लोर

Jalgoan Crime News: अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचार, पोटात 28 आठवड्यांचा गर्भ; गर्भपाताची परवानगी देण्यास न्यायालयाचा नकार

Jalgoan Crime News: जळगावातील एका पंधरा वर्षांच्या तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. परंतु या मुलीचा गर्भपात करण्यास खंडपीठाने परवानगी दिली नाही.

Jalgoan Crime News:  जळगामधील (Jalgoan) एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यास औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. या मुलीचं वय अवघे पंधरा वर्ष असून तिचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा ही मुलगी पोलिसांना एका तरुणासोबत राजस्थानात सापडली. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यामध्ये 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आलं.  तिच्या आईने उच्च न्यायालयात गर्भपाताची परवानगी मिळवण्साठी याचिका दाखल केली. पण खंडपीठाने यासाठी स्पष्ट नकार दिला. 

गर्भपात करण्यास परवानगी का नाकारली? 

वैद्यकीय तपासामध्ये या मुलीच्या उदरात 28 आठवड्यांचा गर्भ असल्याचं आढळून आलं. त्यानंतर तिच्या आईने जळगावमधील शासकीय रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यास परवानगी मिळावी अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. तेव्हा न्यायालयाने शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निर्देश देऊन या संदर्भात एक वैद्यकीय समिती गठित करण्यास सांगितले. तसेच त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले. तेव्हा वैद्यकीय तपासणीच्या अहवालात म्हटलं की, 'गर्भ 28 आठवड्यांचा आहे. गर्भपात केल्यास मुल जिवंत जन्माला येऊ शकते. मात्र पुरेसे विकसित न झाल्यामुळे त्यास निरीक्षणाखाली ठेवावे लागेल. त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या मानसिकतेचा आणि आरोग्याचा देखील प्रश्न आहे.' त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मुलीचा गर्भपात करण्यास परवनागी दिली नाही. अशी माहिती पीडित तरुणीच्या वकील  ऋतुजा जाखडे यांनी दिली. 

या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर अनेकदा अत्याचार आणि बलात्कार देखील करण्यात आला. ही मुलगी फेब्रुवारी महिन्यांत बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी देखील तात्काळ तपास सुरु केला. तेव्हा ही मुलगी पोलिसांना राजस्थानात सापडली. खंडपीठाने गर्भपात करण्यास परवानगी नाकारल्याने तिच्या आईने तिला प्रसूती होईपर्यंत रुग्णालयात किंवा एखाद्या आश्रमात ठेवण्याची विनंती केली. तेव्हा न्यायालयाने तिला नाशिकच्या शेल्टर होममध्ये किंवा  छत्रपती संभाजीनगर येथील शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बालकल्याण विभागाला त्या मुलीच्या आरोग्याची आणि तिच्या प्रसुतीची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

सध्या महाराष्ट्रत सुरु असलेल्या मुलींच्या गायब होण्याच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यातून अनेक मुली गायब होत असल्याचं देखील समोर आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सरकार यावर काही कठोर पावलं उचलणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा : 

Jalna News: पती - पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! पतीनेच घेतला पत्नीचा जीव, पोलीस तपासात झालं उघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBatenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली,
मल्टीकलर साडी, ऑफ शोल्डर ब्लाऊज; जान्हवीच्या क्लासी अदा, म्हणाली, "कसाटा खाण्याची इच्छा होती, तर..."
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Embed widget