एक्स्प्लोर

80 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी 84 वर्षीय पती गजाआड, हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

डोंबिवलीत घरगुती वादातून 84 वर्षीय पती पतीने 80 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना घडलीय.आरोपी पतीने हत्येनंतर त्याच खोलीत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

डोंबिवली : शहरातील शेलारनाका परिसरात क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेला 48 तासांचा अवधी उलटत नाही तोच पुन्हा एकदा घटना समोर आली आहे. 84 वर्षीय वृद्ध नागरिकाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या 80 वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या निर्दयी पतीने तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

पार्वती पाटील असे या घटनेतील महिलेचे नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पती बळीराम पाटील यांना अटक केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांचे ते आई वडील आहेत. इतकी वर्षे सुखाचा संसार केल्यावर आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची काळजी घेत गत आठवणींना उजाळा देण्याच्या काळात जोडीदाराला कायमचा संपवण्याच्या या वृद्ध नागरिकाच्या कृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला, पोटात चाकू असलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल

हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न डोंबिवली पूर्वेकडील गोळवली गावात बळीराम पाटील हे आपल्या पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडासह दोन मजली बंगल्यात राहतात. काल रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे पार्वती आणि बळीराम जेवण झाल्यावर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. यानंतर पती पत्नीत नेहमीप्रमाणे काही करणावरून वाद झाले. संतापाच्या भरात बळीराम यांनी आपल्या पत्नीची कोयत्याने मानेवर, पाठीवर, गळ्यावर, कानावर वार करत हत्या केली. हत्येनंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह त्याच खोलीत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यत सकाळ झाल्याने सुना उठल्याचे कळताच अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह सोडून त्यांनी घर सोडून पळ काढला. सासू सासऱ्याच्या खोलीतून धूर येत असल्याने सुनेने या खोलीत धाव घेत पाहणी केली असता सासूचा अर्धवट जळलेल्या आणि चेहऱ्यावर धारदार हत्याराच्या खुणा असलेला मृतदेह खाटेवर पडलेला दिसला. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी पती बळीराम याला अटक करत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget