एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नागरिकांच्या जीवाशी खेळ, बीडमध्ये दूध पावडरच्या 600 गोण्या जप्त; भेसळयुक्त निर्मितीचा डाव फसला

गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने आज पहाटे या ठिकाणी धाड टाकली.

बीड: दुधात भेसळ करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड दम दिला आहे. तसेच, दुधात भेसळ केल्याचं निदर्शनास आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यात तब्बल 600 पोती पावडर सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी अमिया फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दूध (Milk) तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा 600 गोण्या असलेला साठा अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी धाड टाकुन जप्त केला. आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. अंबादास पांडुरंग चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान आणि लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन देखील आहे. या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दूध निर्मित्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने आज पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर, पोलीस व अधिकाऱ्यांनी या पावडरची पाहणी करुन, तपासणी केली. त्यानंतर, या गोदामात आणखी किती बॅग्ज आहेत, याचीही शहानिशा केली. त्यावेळी, तब्बल 600 गोण्या पावडर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

दरम्यान, एकीकडे दुधाला चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे गाऱ्हाणे मांडतो. दुध उत्पादक संघ किंवा डेअरी मालकांकडून दुधाला योग्य दर दिला जात नाहीत. अनेकदा दुधाच्या फॅटवरुनही डेअरचालक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होताना दिसून येतो. तर, डेअरीमध्ये दूध पावडरचा वापर करुन भेसळयुक्त दूधही बनवले जाते. दुधात होणारी भेसळ ही अनेकदा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ठरू शकते. त्यामुळे, भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीही होत असते.  

हेही वाचा

पुण्यात भीषण अपघातात 2 ठार; नाशिकमध्येही बस-कारची धडक, 2 महिलांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकरRashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Embed widget