Zomato IPO Allotment Status : झोमॅटोचे शेअर अलॉटमेन्ट जारी, असं चेक करा आपले अलॉटमेन्ट
Zomato IPO : झोमॅटो कंपनीचे आयपीओ सबस्क्रिप्शन हे 14 ते 16 जुलै या दरम्यान 72 ते 76 रुपये प्रति इक्विटी शेअर प्राईस बॅन्डमध्ये खुलं झालं होतं. याच्या प्रति शेअरचे फेस व्हॅल्यू हे एक रुपये इतकं होतं.
Zomato IPO Share Allotment: झोमॅटो कंपनीच्या आयपीओचे शेअर अलॉटमेन्ट आज जारी करण्यात आले आहे. 9375 कोटी रुपयांचा असणारा हा आयपीओ 38.25 टक्के अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता. तज्ज्ञांच्या मते, कंपनीने या आयपीओचे लिस्टिग निर्धारित वेळेच्या आधीच करण्याचं ठरवलं असून उद्या म्हणजे 23 जुलैला ही कंपनी मार्केटमधील व्यवहारांना सुरुवात करु शकते.
झोमॅटोच्या आता अलॉटमेन्टच्या घोषणेनंतर आपल्याला शेअर अलॉट झाला की नाही ते आपण बीएसईच्या https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या वेबसाईटवर आणि इनटाईम इंडियाच्या https://linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html या वेबसाईटवर पाहू शकतो.
या आधी असं सांगण्यात आलं होतं की झोमॅटो कंपनी आपली लिस्टिंग 27 जुलैला करणार आहे. पण त्यात बदल झाल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आजच्या या आयपीओच्या लिस्टिंगकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं.
झोमॅटो कंपनीचे आयपीओ सबस्क्रिप्शन हे 14 ते 16 जुलै या दरम्यान 72 ते 76 रुपये प्रति इक्विटी शेअर प्राईस बॅन्डमध्ये खुलं झालं होतं. या प्रति शेअरचा फेस व्हॅल्यू हा एक रुपये इतका होता. तर गुंतवणूकदारांना किमान 195 शेअर्स साठी बोली लावायची होती. कंपनीच्या नियमानुसार, गुंतंवणूकदार हे कमाल 13 लॉट घेऊ शकतात. तसेच कंपनीच्या नियमानुसार एक गुंतवणूकदार हा दोन लाख रुपयांहून जास्त गुंतवणूक करु शकत नाही.आयपीओच्या आधीच झोमॅटोने 4196.51 कोटी रुपये जमा केले होते.
आयपीओच्या आधारे किंमत काढली तर झोमॅटोचे बाजारातील मूल्यांकन हे 64,365 कोटी रुपये इतकं आहे. झोमॅटो एक रेस्टॉरंट अॅग्रिगेटर आहे. या कंपनीकडून ग्राहकांना रेस्टॉरंटमधून फूड डिलिव्हर केलं जातं. तसेच या हॉटेल आणि रेस्टॉरंटचे रिव्ह्यूदेखील दिले जातात, त्यांचं मार्केटिंग केलं जातं. या कंपनीचा कोणताही प्रमोटर नाही. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये इन्फो एज, अॅन्ट फायनान्शियल आणि उबेरचा समावेश आहे.
गेल्या वर्षी झोमॅटोच्या महसूलात 96 टक्क्यांची वृद्धी झाली होती. सन 2019 साली झोमॅटोचा महसूल हा 1398 कोटी रुपये इतका होता. गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली त्यामध्ये वाढ होऊन तो 2743 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी झोमॅटोला 403 मिलियन ऑनलाईन ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्याचा आकडेवारीत हिशोब केला तर तो 11,221 कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षी झोमॅटोने दोन लाख डिलिव्हरी पार्टनर्सच्या माध्यमातून भारतभरात जवळपास 500 शहरांत फूड डिलिव्हरी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Chiplun Flood : कोकणात पावसाचा कहर! चिपळुणात पूरपरिस्थिती; संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा
- Maharashtra Rain PHOTO: राज्यभरात पावसाचं धुमशान, नद्यांना पूर, अनेक गावं पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
- Mumbai Maharashtra Rain : पावसाचं रौद्ररुप! राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, घरं पाण्यात, पुढील पाच दिवस सावध राहा...