गाढवाच्या दुधाची विक्री, महिन्याला तरुण मिळवतोय 3 लाखांचा नफा, या दुधाचे नेमके फायदे काय?
गाढवाचं दूध (Donkey Milk) विकून एक तरुण मोठा नफा मिळवत आहे. गाढवाच्या दूध विक्रीतून हा तरुण महिन्याला 3 लाख रुपये मिळवत आहे.
Donkey Milk : अलिकडच्या काळात तरुण नोकरीच्या मागे न लागता विविध उद्योग व्यवसाय करत आहेत. अनेजण दूध व्यवसायातून (Dairy Business) मोठा नफा कमावत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा (success story) पाहणार आहोत, ज्यानं, गाढवाचं दूध (Donkey Milk) विकून मोठा नफा मिळवला आहे. गाढवाच्या दूध विक्रीतून हा तरुण महिन्याला 3 लाख रुपये मिळवत आहे. धीरेन सोलंकी असं गुजरातमधील (Gujrat) पाटण जिल्ह्यातील तरुणाचं नाव आहे.
गाढवाच्या दुधात विविध औषधी गुणधर्म
सध्या गाढवाच्या दुधाला मोठी मागणी आहे. कारण गाढवाच्या दुधात विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळं ते दूध माणसाच्या शरीरासाठी चांगले समजले जाते. त्यामुळं गुजरातमधी धीरेन या तरुणाने गाढवाचे दूध विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. यातून त्याला मोठा नफा मिळत आहे. महिन्याला तीन लाखांचा नफा होत आहे. लहान मुलांसाठी तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी गाढवाचे दूध हा चांगला पर्याय समजला जातो. इतर प्राण्यांच्या दुधापेक्षा गाढवाच्या दुधात अधिक पोषक तत्वे आढळतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट रोगांशी लढण्यास मदत करतात. त्यात असलेल्या अँटी-एजिंग गुणधर्मामुळे गाढवाच्या दुधाला बाजारात मोठी मागणी आहे. दरम्यान धीरेन यांचा यशस्वी व्यवसाय पाहून इतरही शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. गाढवाचे दूध विक्री व्यवसायातून चांगला नफा होत असल्यानं काही तरुण या व्यवसायाकडे येत असल्याचंही दिसत आहे.
नोकरी सोडून गाढवांच व्यवसाय
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, धीरेन हे खासगी नोकरी करत होते. या नोकरीत त्यांना अल्प पगार मिळत होता. ते घरचा खर्चही भागवू शकत नव्हते. या काळात काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यानंतर गाढव पालन करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. कारण गाढवाचे दूध खूप महाग विकले जाते. 1 लीटर गाढवाच्या दुधाची किंमत ही 5000 रुपये आहे. सुरुवातील कमी गाढवे होती. त्यानंतर हळूहळू धीरेन यांनी गाढवांची संख्या वाढवली. यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
सुरुवातीला 22 लाख रुपयांची गुंतवणूक
धीरेन यांनी सुरुवातील गाढव पालन व्यवसायात 22 लाख रुपये गुंतवले होते. त्यांनी 20 गाढवांसह व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्याकडे आज 42 गाढवे आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र, ते मागे हटले नाही. गुजरामध्ये गाढवाच्या दुधाला म्हणावी तशी मागणी नव्हती. त्यामुळं त्यांनी दूध बाहेरच्या राज्यात विक्री करण्यावर लक्ष दिले. ऑनलाईन माध्यमातून त्यांनी दुधाची विक्री केली. कर्नाटक आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात गाढवाच्या दुधाची विक्री होते. तसेच सौंदर्यप्रसादने तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये गाढवाचे दूध वापरले जाते.
गाढवाच्या दुधाची ऑनलाईन विक्री
धीरेन यांनी गाढवाच्या दुधाची ऑनलाईन विक्री सुरु केल्यामुळं याचा मोठा फायदा झाला. कारण यामुळं ग्राहकांची संख्या वाढली. सध्या गाढवाचे दूध 5,000 रुपये प्रति लीटरने विकले जाते. तर गाईचे दूध 60-65 रुपये लीटरने विकले जाते. ग्रामीण भागात तर गाईचे दूध 25 ते 30 रुपये दरानेच विकले जाते. त्यामुळं गाढवाचे दूध आणि गाईचे दूध यामध्ये मोठा फरक आहे.
महत्वाच्या बातम्या: