(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऐकावं ते नवलच! काहीही न करता फक्त झोपून महिलेनं जिंकले तब्बल 9 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
बंगळुरुच्या (Bangalore) एका महिलेने काहीही न करता तब्बल 9 लाख रुपये जिंकले आहेत. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरं आहे.
Business News : बंगळुरुच्या (Bangalore) एका महिलेने काहीही न करता तब्बल 9 लाख रुपये जिंकले आहेत. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरं आहे. साईश्वरी पाटील (Saishwari Patil) असं या महिलेच नाव आहे. या महिलेने काहीही न करता फक्त झोपून 9 लाख रुपये जिंकले आहेत. जाणून घेऊया साईश्वरी पाटीलने ही कमाई नेमकी केली कशी?
तुम्ही अशा इंटर्नशिपबद्दल ऐकले आहे का? जिथे तुम्हाला फक्त झोपण्यासाठी पैसे मिळतात, तेही लाखात. बंगळुरु येथील इन्व्हेस्टमेंट बँकर साईश्वरी पाटील यांनी अशाच एका इंटर्नशिपमध्ये तब्बल 9 लाख रुपये कमावले आहेत. साईश्वरीने होम आणि स्लीप सोल्यूशन ब्रँड वेकफिटच्या स्लीप इंटर्नशिप कार्यक्रमात भाग घेतला होता, ज्यामध्ये ती स्लीप चॅम्पियन बनली आणि हे विजेतेपद जिंकण्यासाठी तिला 9 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. कार्यक्रमातील इतर 12 स्लीप इंटर्नपैकी ती एक होती.
जे झोपेला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हा प्रोग्राम
स्लीप इंटर्नशिप प्रोग्राम ज्याचा बँकर साईश्वरीचा एक भाग होती. जे झोपेला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हा प्रोग्राम होता. पण अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळे आपले जीवन अव्यवस्थित दिसते. महिलेने सांगितले की या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक इंटर्नला आठ ते नऊ तास चांगली झोप घ्यावी लागली. याशिवाय दिवसभरात 20 मिनिटे चांगली डुलकी घेणे हा देखील या कार्यक्रमाचा एक भाग होता. ज्यामध्ये साईश्वरी यशस्वी ठरली आणि स्लीप चॅम्पियन बनली. निवडलेल्या सर्व इंटर्नला वेकफिटकडून उच्च दर्जाचे मॅट्रेस आणि स्लीप ट्रॅकर देण्यात आला आहे. त्याच वेळी, त्यांच्या झोपेचे नमुने सुधारण्यासाठी आणि झोपेचा चॅम्पियन बनण्याची शक्यता वाढवण्यासाठी झोपेच्या मार्गदर्शकांद्वारे अनेक सत्रे देखील आयोजित केली गेली.
साईश्वरीने दिल्या झोपेशी संबंधित काही टिप्स
प्रसारमाध्यमांशी बोलताना साईश्वरीने झोपेशी संबंधित काही टिप्स शेअर केल्या आहेत. जसे की मन शांत करण्यासाठी चांगले संगीत ऐकणे. झोपण्याच्या एक तास आधी कोमट पाण्याने आंघोळ करावी. वेकफिटचा हा उपक्रम आधुनिक जीवनशैलीतील झोपेची कमतरता यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकतो. कारण आजकाल लोक काम-धावपळ, दबाव, सोशल मीडिया आणि इतर अनेक गोष्टींमुळं झोपेला प्राधान्य देऊ शकत नाहीत. या कार्यक्रमाने लोकांना फक्त जास्त वेळ झोपण्यास प्रवृत्त केले नाही तर त्यांना नीट आणि मनःशांतीसह झोपायला देखील शिकवले.
महत्वाच्या बातम्या: