स्विगी ते निवा बुपा! या आठवड्यात खुले होणार एकूण 5 आयपीओ, पैसे ठेवा तयार
गेल्या काही महिन्यांत आलेल्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आता या आठवड्यात एकूण पाच आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
IPO News : शेअर बाजारात आगामी आठवड्यात एकूण पाच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. या पाच कंपन्यांच्या आयपीओंमध्ये स्विगी या कंपनीच्या आयपीओचाही समावेस आहे. हे पाच आयपीओ नेमके कोणते आहेत? हे जाणून घेऊ या....
1- Sagility India Limited IPO
हा मेनबोर्ड आयपीओ आहे. Sagility India हा आयपीओ एकूण 2106.60 कोटी रुपयांचा असणार आहे. हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी येत्या 5 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओसाठी किंमत पट्ट 28 ते 30 रुपये आहे. Sagility India या आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण 500 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 15,000 रुपये असायला हवेत.
2- स्विगी आयपीओ (Swiggy IPO)
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी या कंपनीचाही आयपीओ आला आहे. 6 ते 8 नोव्हेंबर या काळात तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ एकूण 11,327.43 कोटी रुपयांचा आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 371 ते 390 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आलेला आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण 38 शेअर्स असतील. म्हणजेच तुम्हाला या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 14,820 रुपये असायला हवेत.
3- ACME Solar Holdings IPO
ACME या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 6 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या कंपनीत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ एकूण 2900 कोटी रुपयांचा असणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी एकूण 8.29 कोटी फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 275 रुपये ते 289 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण 51 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 14,739 रुपये असणे गरजेचे आहे.
4- निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स (Niva Bupa Health Insurance IPO)
निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 7 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ एकूण 2200 कोटी रुपयांचा असणार आहे. या आयपीओसाठी अद्याप किंमत पट्टा निश्चित करण्यात आलेला नाही.
5- Neelam Linens and Garments IPO
हा एकूण 13 कोटी रुपयांचा आयपीओ आहे. हा एकूण 13 कोटी रुपयांचा आयपीओ आहे. या आयपीओत 8 नोव्हेंबरपासून गुंतवणूक करता येईल. 12 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला यात गुंतवणूक करता येईल. त्यासाठी 20 रुपये ते 24 रुपये प्रति शेअरचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आलेला आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 6000 शेअर्स आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
क्रेडिट कार्ड वापरताना 'या' तीन चुका कधीच करू नका, अन्यथा खिसा होईल खाली!
बँकेकडून कर्ज घेताना 'या' पाच गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान!