तुमच्याकडील पैशांची कुठे कराल गुंतवणूक? परताव्याचे चांगले पर्याय कोणते?
भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं आहे. 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे नेमके कुठे गुंतवावे? असा प्रश्न जर पडला असले तर याबाबतची माहिती पाहुयात.
Investment Plan : नवीन वर्षाला सुरुवात होऊन दोन आठवडे होऊन गेले. या नवीन वर्षात तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे का? किंवा करणार आहोत का? कारण भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणं गरजेचं आहे. 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे नेमके कुठे गुंतवावे? असा प्रश्न जर पडला असले तर याबाबतची माहिती आपण पाहुयात.
कुठे कराल तुमच्या पैशांची गुंतवणूक ?
तुम्ही जर चार किंवा पाच लाखांची गुंतवणूक करणार असाल तर एवढ्या मोठ्या रकमेचा मोठा भाग लार्ज-कॅप म्युच्युअल फंडात गुंतवावा. तर उरलेला भाग डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवावा. लार्ज-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्यामागील तर्क असा आहे की त्यांचे मूल्य अद्याप जास्त नाही, तर कर्ज निधीमध्ये गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी केली पाहिजे. कारण व्याजदर चांगला आहे. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूक 70 टक्के ते 30 टक्के दरम्यान विभागली पाहिजे. म्हणजे 3.5 लाख रुपये लार्ज-कॅप फंडात गुंतवावेत आणि उर्वरित 1.5 लाख रुपये डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवावेत.
गुंतवणुकीचा कोणताही निर्णय हा गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून
गुंतवणुकीचा कोणताही निर्णय हा गुंतवणुकीच्या कालावधीवर अवलंबून असतो. म्हणजे गुंतवणूक अल्प मुदतीसाठी करायची आहे की दीर्घ मुदतीसाठी. एखाद्याने लार्ज-कॅप समभागांमध्ये 70 टक्के गुंतवणूक करावी, कारण त्यांचे मूल्य अद्याप जास्त झालेले नाही. एखाद्याने ग्रोथ स्टॉकमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, कारण मूल्य स्टॉक आधीच खूप महाग आहेत. उर्वरित पैसे 2-3 वर्षांच्या कालावधीसह डायनॅमिक बाँड फंडात वाटप केले जाऊ शकतात. तुमची आर्थिक उद्दिष्टे अजून दूर असतील तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करु शकता. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो.
महत्त्वाच्या बातम्या: