Fact Check : 500 रुपयांची नोट बंद होणार असल्याबाबतचा मेसेज व्हायरल, पीआयबीकडून फॅक्ट चेक, जाणून घ्या सत्य
Fact Check : गेल्या काही दिवसांपासून 500 रुपयांची नोट बंद होऊ शकते, असा मेसेज व्हायरल होत आहेत. पीआयबीकडून त्याचं फॅक्ट चेक करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्यात आल्यानंतर 500 रुपयांच्या नोटेबाबत नवा दावा केला जात आहे. आरबीआय सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटेचं वितरण बंद करण्याबाबत निर्देश दिल्याचा दावा सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज करण्यात येत होता. यामुळं अनेक जणांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.फॅक्टचेकमध्ये हा दावा चुकीचा असल्याचं समोर आलं आहे. आरबीआयनं अशा प्रकारचं कोणतंही नोटीस काढलेलं नाही किंवा निर्देश दिलेले नाहीत.
व्हायरल मेसेजमध्ये काय?
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये आरबीआयकडून सर्व बँकांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणं बंद करण्यास सांगितल्याचा दावा केला जात होता. 75 टक्के बँकांच्या एटीएममधून 31 मार्च 2026 पर्यंत 90 टक्के एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा बंद होतील. एटीएम 200 आणि 100 रुपयांच्या नोटा मिळतील. यासाठी 500 रुपयांच्या नोटांचा आतापासून वापर करा असा संदेश व्हायरल मेसेजमध्ये देण्यात आला.
पीआयबी फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
पीआयबी फॅक्ट चेकमध्ये व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकनं सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये आरबीआयकडून असा कोणताही आदेश दिला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 500 रुपयांची नोट अजून लीगल टेंडर आहे असं सांगण्यातआलं आहे. त्यामुळं 500 रुपयांच्या नोटांचा वापर कायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
चुकीच्या माहितीपासून दूर राहा
पीआयबीनं लोकांना चुकीच्या माहितीपासून दूर राहावं, असं सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेक यूनिटनं कोणत्याही बातमीचं सत्य शोधण्यासाठी सरकारी वेबसाईटला भेट देण्यातं आवाहन केलं आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 500 रुपयांची नोट बंद करण्यासंदर्भात कोणतंही अधिकृत पत्रक किंवा नोटीस काढण्यात आलेलं नाही. त्यामुळं 500 रुपयांची नोट अधिकृत आहे. खोट्या व्हायरल मेसेज वर लोकांनी विश्वास ठेवू नये असं सांगण्यात आलं आहे.
तुम्हाला आरबीआयच्या कोणत्याही अधिकृत निर्णयाची माहिती घ्यायची असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.आरबीआयकडून दररोज प्रसिद्धीपत्रक जारी केलं जातं. याशिवाय आरबीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटसवरुन देखील अपडेट मिळवू शकता.
Has RBI really asked banks to stop disbursing ₹500 notes from ATMs by September 2025? 🤔
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 12, 2025
A message falsely claiming exactly this is spreading on #WhatsApp #PIBFactCheck
✅ No such instruction has been issued by the @RBI.
✅ ₹500 notes will continue to be legal tender.
🚨… pic.twitter.com/znWuedOUT8
























