आयटीआर भरताना 'ही' चूक कधीच करू नका, पैसे रिफंड होणार नाहीत; वाचा सविस्तर!
आयटीआर भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. येणाऱ्या 31 जुलैपर्यंत तुम्हाला आयटीआर भरता येणार आहे. पण आयटीआर भरताना ई-व्हेरिफिकेशन फार गरजेचे आहे.
मुंबई : तुम्ही आतापर्यंत आयटीवर कर परतावा भरलेला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपसून करपरतावा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चलू झालेली आहे. आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या सर्व करदात्यांनी वेळेवर आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे.
तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. एकदा आयटीआर भरला म्हणजे लगेच तुम्हाला पैसे रिफंड होतील असं नाही. आयटीआर भरल्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तुम्हाला लवकर रिफंड हवे असेल तर आयटीआर फाईल करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतील, ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रिटर्न्स मिळेल.
'हे' मह्त्वाचे काम करणे गरजेचे
तुम्हाला लवरकर कर परतावा हवा असेल तर आयटीआर भरल्यानंतर (ई-फायलिंग) तुम्हाला ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तुम्ही ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा आयटीआर फॉर्म अपूर्ण आहे असे समजले जाईल. त्यामुळे आयटीआर भरल्यानंतर त्याचे ई-व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे.
ई-व्हेरिफिकेशन कधीपर्यंत पूर्ण करावे?
तसं पाहायचं झाल्यास आयटीआरचा फॉर्म भरतानाच ई-व्हेरिफिकेशन करून घ्यायला हवे. आयकर विभागानुसार ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी एकूण 120 दिवसांचा कालावधी दिला जातो. या 120 दिवसांच्या आत तुम्ही ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्ही 120 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा आयटीआरचा फॉर्म अपूर्ण आहे, असे गृहित धरले जाते आणि तुम्हाला रिफंड मिळत नाही. ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया तुम्हाला डी-मॅट अकाऊंट, आधार, एटीएम, नेट बँकिंग किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) च्या मदतीने पूर्ण करू शकता.
ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण कशी कराल?
ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अगोदर https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकला बेट द्या.
त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा
त्यानंतर ई-फाईल मेन्यूवर क्लीक करा. त्यानंतर ई-व्हेरिफिकेशन हा ऑप्शन सिलेक्ट करा
पुढे पॅन नंबर टाकून असेसमेंट इयर निवडा. त्यानंतर आयटीआर फाईलचा रिसिप्ट नंबर आणि मोबाईल क्रमांक टाका
त्यानंतर ई-व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला हवे असेल ते माध्यम निवडा
ई-व्हेरिफिकेशनची प्रोसेस डीमॅट अकाऊंट, आधार, एटीएम नेट बँकिंग अशा कोणत्याही माध्यमातून ई-व्हेरिफिकेशन करता येते.
ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ट्रान्जेक्शन आयडीवर तसा मेसेज दिसेल.
हेही वाचा :
नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून किती पगार मिळणार? अन्य देशांतील नेतृत्त्वाला किती मानधन मिळते? वाचा सविस्तर...
मोठी बातमी! 'गुगल पे' बंद, गुगल कंपनीने घेतला मोठा निर्णय