निवडणुकीच्या काळात कोणता म्यूच्यूअल फंड योग्य, गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?
सध्याच्या निवडणुकीच्या काळात शेअर बाजारात-चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यायला हवी? असे विचारले जात आहे.
![निवडणुकीच्या काळात कोणता म्यूच्यूअल फंड योग्य, गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी? what care have to take in general election period while investing in mutual funds know detail information in marathi निवडणुकीच्या काळात कोणता म्यूच्यूअल फंड योग्य, गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/c0398c66617ce625c8f0c3224b82cd0e1716429557045988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळणार आहेत. गेल्या आठवड्यात शेअर बाजार सावरला. पण या निवडणुकीच्या काळात शेअर बाजारात साधारण दोन टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली होती. याच कारणामुळे सध्या शेअर बाजार, म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार थोडी काळजी घेत आहेत.
म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करणारे संभ्रमात
अजूनही शेअर बाजारात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते आगामी काळातदेखील शेअर बाजार अशाच प्रकारे व्होलाटाईल राहू शकतो. म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारदेखील सध्या संभ्रमात आहेत. भविष्यात नेमकं काय होणार? नेमकं कोणत्या फंडात गुंतवणूक केली पाहिजे, असे अनेक प्रश्न सध्या गुंतवणूकदारांना पडतायत. कारण सध्याच्या काळात म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना तोटा झाला आहे, तर काही गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसला आहे.
तज्ज्ञ काय सांगतात ?
इक्वेशन फायनान्शियल सर्व्हिसेसचे कपिल होळकर यांच्या मते सध्याच्या व्होलाटाईल बाजाराच्या स्थितीत मल्टी असेट फंड गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. सध्याच्या स्थितीत थेट भविष्याचा वेध घेणे थोडे कठीण आहे. तुम्ही सामान्य गुंतवणूकदारांप्रमाणे विचार करून पोर्टफोलीमध्ये विविधता न आणल्यास तुम्हाला गुंतवणुकीत तोटा होऊ शकतो. तुमचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्स असायला हवा. तसे असल्यास सध्या मार्केट व्होलाटाईल असताना तुम्ही सुरक्षित राहू शकता. त्यामुळेच सध्या मल्टी एसेट फंडात गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
मल्टी असेट फंड म्हणजे काय?
मल्टी असेट फंड हा हायब्रीड फंड असतो. हा फंड वेगवेगळ्या इक्विटी, डेट, कमोडिटी तसेच अन्य क्षेत्रात गुंतवणूक करतात. सेबीच्या नियमानुसार मल्टी असेट फंडाने कमीत कमी तीन वेगवेगळ्या अॅसेट्स क्लासमध्ये एकूण एयूएमच्या असेट 10 टक्के गुंतवले पाहिजेत.
मल्टी असेट फंडाचे रिटर्न्स काय?
मल्टी असेट फंडाने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. निप्पॉन इंडिया मल्टी असेट फंड आणि एसबीआय मल्टी असेट फंड ही त्याची काही उदाहरणे आहेत. या दोन्ही फंडांनी अनुक्रमे 32.26 टक्के आणि 28.24 टक्के रिटर्न्स दिले आहेत. मल्टी असेट फंडात गुंतवणूक करतानादेखील काळजी घेणे गरजेचे आहे. मल्टी असेट फंडाचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्स असायला हवा. असेट लोकेशनमध्ये सतत बदल करणारे मल्टी कॅप फंड निवडू नयेत.
हेही वाचा :
खतांचं योग्य नियोजन, यावर्षी तुटवडा होणार नाही, विकास पाटील यांची माहिती
चांदीचा नवा विक्रम! गाठला 95 हजारांचा टप्पा, लवकरच चांदी होणार 1 लाख रुपये?
निर्यातबंदी हटवल्यानंतर 45 हजार टन कांद्याची निर्यात, मात्र शेतकरी नाराजच, नेमकं प्रकरण काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)