(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खतांचं योग्य नियोजन, यावर्षी तुटवडा होणार नाही, विकास पाटील यांची माहिती
सरकारनं केलेल्या नियोजनानुसार डीएपी खते उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या निविष्ठा व गुण नियंत्रणचे संचालक विकास पाटील (Vikas Patil) यांनी दिली.
Fertilizers : डीएपी आणि इतर रासायनिक खतांचा (fertilizers) योग्य नियोजन (Planing) सरकारने केलं आहे. नियोजनानुसार डीएपी खते उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या निविष्ठा व गुण नियंत्रणचे संचालक विकास पाटील (Vikas Patil) यांनी दिली आहे. त्यामुळं बाजारात कुठेही खतांचा आणि खास करुन डीएपी खतांचा तुटवडा होणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
केंद्र सरकारने निश्चित दिलेल्या दरावरच शेतकऱ्यांना खते मिळणार
आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती खास करुन इजराइल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध या कारणामुळे काही रासायनिक खतांच्या विशेषत्वाने डीएपीसाठीचा कच्चामाल उपलब्ध नाही. म्हणून यंदा खतांची उपलब्धता राहणार नाही. खतांचे दर वाढतील अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, कृषी विभागाच्या निविष्ठा व गुण नियंत्रन संचालक विकास पाटील यांनी राज्यात खतांची मुबलक प्रमाणात उपलब्धता सरकारने योग्य नियोजन केले आहे. राज्यात केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या दरावरच शेतकऱ्यांना डीएपी व इतर खत उपलब्ध होईल असा दावा केला आहे.
सध्या देशातील सरकारी धोरण आणि हमास, इजराईल येथे युद्धजन्य परिस्थितीत होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे रासायनिक खताच्या निर्मितीसाठी लागणरे साहित्य गरजेनुसार मिळत नाही. तसेच जे मिळत आहे त्यांचे दर जास्त असल्याने ते खरेदी करणे शक्य नसल्याचे मत खत व्यापऱ्यांकडून सांगण्यात आले होते. दुसरीकडे शासनाकडून मिळणाऱ्या सवलती देखील तुटपुंजी असल्याने अशा खतांची निर्मिती करणे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही परवडणारे नाही. त्यामुळे या हंगामात शेतकऱ्यांना डी ए पी सारखी रासायनिक खते मिळणार नसल्याचे मत रासायनिक खताचे होलसेल विक्रेत्यांनी सांगितले होते. मात्र, राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी कोणत्याही प्रकारच्या खतांचा तुटवडा भासणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळणार का?
खरीप हंगाम तोंडावर आला कि शेतकरी पेरणीच्या तयारीला लागत असतात. मात्र, पेरणीपूर्वी शेतकरी आपल्या शेतात पिकाच्या वाढीसाठी डीएपी सारखी रासायनिक खते वापरत असतात. असे असताना आता शेतकऱ्यांना ही रासायनिक खते मिळणार नसल्याचे चित्र आहे. कारण रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यानी डीएपी खते निर्मिती जवळपास बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डीएपी सारखी खते कमी किमतीत देणे शक्य नसल्याचे खत विक्रेते आणि व्यापऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: