एक्स्प्लोर

Warren Buffett :  दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी या स्टॉकला केला 'टाटा'; एका झटक्यात सगळे शेअर्स विकले

Warren Buffett : दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी एका कंपनीतील आपल्या सगळ्या शेअर्सची विक्री केली आहे.

Warren Buffett :  जगभरातील गुंतवणूकदार हे अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffett) यांना आपला आदर्श मानतात. बफेट ज्या कंपनीत पैसे गुंतवतात त्या कंपनीचे शेअर्स रॉकेट प्रमाणे तेजीने वधारतात. त्याचप्रमाणे ज्या कंपनीच्या शेअर्स विक्री करतात, त्या कंपनीच्या शेअर दराला धक्का बसतो. 

दरम्यान, बफेट यांच्या कंपनी बर्कशायर हॅथवेने (Berkshire Hathaway) अमेरिकेतील आघाडीची ऑटो कंपनी जनरल मोटर्सचे (General Motors) सर्व शेअर्स विकले आहेत. बफेट यांच्याकडे या कंपनीचे 85 दशलक्ष डॉलर्स किमतीचे शेअर्स होते. हे शेअर्स त्यांनी मागील तिमाहीत विकले. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनच्या फाइलिंगमध्ये ही बाब समोर आली आहे. बुधवारी, जनरल मोटर्सचे शेअर्स 0.21 टक्क्यांनी घसरून 28.14 डॉलरवर बंद झाले.

'जनरल मोटर्स'ला ऑटो कामगारांच्या संपाला सामोरे जावे लागत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की यामुळे यावर्षीच्या कमाईत 800 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बर्कशायरचा एकूण पोर्टफोलिओ 313 अब्ज डॉलर्सचा आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत इतर काही मोठ्या कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. यामध्ये Amazon, HP, Chevron, Procter & Gamble, UPS, Mondelez International आणि Johnson & Johnson यांचा समावेश आहे. एकूणच, बर्कशायरने 7 अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले आणि गेल्या तिमाहीत 1.7 अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स विकत घेतले.

गेल्या एका वर्षात कंपनीने 40 अब्ज डॉलर्स किमतीचे स्टॉक विकले आहेत. मात्र, गेल्या तिमाहीत, बर्कशायरने सॅटेलाइट रेडिओ कंपनी सिरियस Sirius XM चे सुमारे 10 लाख शेअर्स 50 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले. त्यामुळे गुरुवारी कंपनीच्या किमतीत सुमारे सहा टक्क्यांनी वाढ झाली. तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी, बर्कशायरकडे विक्रमी 157 अब्ज डॉलर्स रोख रक्कम होती. मागील तिमाहीच्या शेवटी, ही रक्कम 147 अब्ज डॉलर्स होती. यापूर्वी, 2021 मध्ये कंपनीकडे सर्वाधिक रोख 149 अब्ज डॉलर्स होते.

(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा)

इतर संबंधित बातमी : 

Tata Tech IPO : पैसे तयार ठेवा! Tata Tech आयपीओ प्रति शेअरची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget