विराट-अनुष्काची शेअर बाजारात जबरदस्त बॅटिंग, 'ही' आयडिया लावून झटक्यात कमवले तब्बल 9 कोटी!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गो डिजिट या कंपनीत गुंतवणूक केली होती. आता चार वर्षांनंतर या दोघांनी या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपये कमवले आहेत.
मुंबई : सेअर बाजार हे असे क्षेत्र आहे, जिथे एखादी व्यक्ती एका क्षणात श्रीमंत होते. तर कधीकधी एखाद्या व्यक्तीचे एका क्षणात लाखो रुपये जातात. शेअर बाराजात (Share Market) कोणीही पैसे गुंतवू शकतो. त्यामुळेच सामान्य माणसापासून ते राजकीय व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री यासह खेळाडूदेखील शेअऱ बाजारात वेगवेगळ्या माध्यमातून पैसे गुंतवत असतात. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनीदेखील शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी गो डिजिट कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. काही दिवसांपूर्वी या कंपनीचा आयपीओ आला होता. सध्या ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली असून यातून विराट-अनुष्का शर्माला थेट नऊ कोटी रुपये मिळाले आहेत.
विराट कोहली-अनुष्काने कमवले नऊ कोटी रुपये
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गुंतवणूक केलेली गो डिजीट ही कंपनी आज शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली. शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच या कंपनीने दमदार कामगिरी केली. सध्या या कंपनीचा शेअर थेट 300 रुपयांच्या पार गेला आहे. यातून विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना थेट 9 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या कंपनीचा 272 प्रतिशेअर या प्रमाणे आयपीओ आला होता, तेव्हा तो नऊ पटीने सबस्क्राईब झाला होता. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली तेव्हा तिच्या शेअरचे मूल्य BSE वर 281.10 तर NSE वर 286.00 रुपये झाले. म्हणजेच शेअर बाजारात सूचिबद्ध होताच विराट-अनुष्का यांना थेट 5.15 टक्क्यांनी नफा झाला. शेअर सूचिबद्ध झाल्यानंतरही या कंपनीच्या शेअरचा दर वाढतच राहिला. BSE वर हा शेअर 291.45 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच विराट-अनुष्काला थेट 7.15 टक्क्यांचा नफा मिळाला. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 308 रुपये आहे. म्हणजेच या जोडीच्या नफ्यात आणखी वाढ झाली आहे.
विराट अनुष्काने किती गुतंवणूक केली होती?
विराट कोहलीने गो डिजिट या कंपनीत फेब्रुवारी 2020 मध्ये 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 2,66,667 इक्विटी शेअर्स खरेदी केली होते. तर याच कंपनीत अनुष्का शर्माने 50 लाख रुपयांची गुंतवणूक करून 66,667 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. या दोघांनाही 75 रुपये प्रति शेअर या प्रमाणे ही गुंतवणूक केली होती. आज ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली आहे. म्हणजेच या दोघांनी चार वर्षांपूर्वी गुंतवलेल्या 2.50 कोटी रुपयांचे आज तेट 9 कोटी 53 लाख 3 हजार 524 रुपये झाले आहेत. त्यांना या चार वर्षांत 271 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत.
Go Digit IPO जबरदस्त रिस्पॉन्स
गो डिजिट या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ एकूण 2,614.65 कोटी रुपयांचा होता. हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी 15-17 मे या काळात खुला होता. या आयपीओला 9.60 पटीने सबस्क्राईब करण्यात आलं होतं. या कंपनीच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काळात ही कंपनी तोट्यात होती. या कंपनीला 2021 साली 122.76 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. नंतर आगामी वित्त वर्ष 2022 मध्ये हा तोटा वाढऊन 295.85 रुपयांवर गेला. त्यानंतर मात्र ही कंपनी सावरली. वित्त वर्ष 2023 मध्ये या कंपनीला 35.54 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यानंतर वित्त वर्ष 2023-24 च्या पहिल्या 9 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीला 129.02 कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला. या कंपनीच्या डोक्यावर 200 कोटींचे कर्ज आहे.
हेही वाचा :
आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं आणखी सोप्पं, RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही!
गुरुवारी गुंतवणूकदार मालामाल! निफ्टी पहिल्यांदाच 22800 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वधारला!
शेअर बाजारावर 'हे' पाच शेअर्स ठरणार किंग, महिन्याभरात गुंतवणूकदार होणार मालामाल?