Vijay Shekhar Sharma: पेटीएम बँकेचे चेअरमन विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा, नवीन कार्यकारी मंडळ स्थापन होणार
Vijay Shekhar Sharma : विजय शेखर शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर आता बँकेच्या संचालक मंडळाची नव्याने निर्मिती केली जाणार आहे.
मुंबई: आरबीआयने कारवाई केल्यानंतर अडचणीत आलेल्या पेटीएम बँकेचे (Paytm Payments Bank) चेअरमन विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाची नव्याने निर्मिती केली जाणार आहे.
Vijay Shekhar Sharma steps down as chairman of Paytm Payments Bank; bank reconstitutes board: Regulatory filing
— Press Trust of India (@PTI_News) February 26, 2024
One97 Communication Limited ने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळातून आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विजय शेखर शर्मा यांनी देखील बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
नव्या बोर्डची निर्मिती
स्टॉक एक्स्चेंजला पाठवण्यात आलेल्या निवेदनात पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, सेवानिवृत्त IAS देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त ISS रजनी सेखरी सिब्बल यांचा बोर्डात समावेश करण्यात आला आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेचा भविष्यातील कारभार हा नव्याने स्थापन झालेल्या बोर्डद्वारे पाहिला जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट्स बँकेवर कारवाई करत त्यांना नवीन ग्राहक जोडण्यास आणि कर्ज देण्यास बंदी घातली होती. बँकेच्या केवायसी प्रक्रियेतील अनियमिततेमुळे ही बंदी घालण्यात आली आहे. पेटीएम पेमेंट बँकेची स्थापना 2017 मध्ये झाली. ही बँक भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.
रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (NPCI) पेटीएम ॲपद्वारे UPI ऑपरेशन सुरू ठेवण्यासाठी पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या विनंतीवर विचार करण्यास सांगितले आहे. एनपीसीआयला थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून पेटीएमची यूपीआय सेवा कायम राहिल.
RBI FAQ नुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत उघडलेली बँक खाती 15 मार्चनंतरही बंद होणार नाहीत. जर तुमचे पेटीएम पेमेंट्स बँकेत बचत किंवा चालू खाते उघडले असेल आणि त्यात पैसे असतील, तर तुम्ही 15 मार्चनंतरही काढू शकता जसे तुम्ही आतापर्यंत करत आहात. जोपर्यंत तुमच्या खात्यात शिल्लक आहे तोपर्यंत त्याच्या वापरावर कोणतेही बंधन नाही.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)