शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटच्या घसरणीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शेअर मार्केटच्या घसरणीचा संबंध लोकसभा निवडणुकीशी जोडू नये असे वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे.
Amit Shah On Share Market : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये (Share Market) चढ उतार सुरुच आहे. कधी बाजार तेजीत असतो तर कधी बाजारात मंदी असते. दरम्यान, शेअर मार्केटच्या घसरणीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शेअर मार्केटच्या घसरणीचा संबंध लोकसभा निवडणुकीशी जोडू नये असे वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. 4 जून 2024 नंतर शेअर बाजार तेजीत राहणार असल्याचे शाह म्हणाले.
शेअर मार्केटमधील घसरणीचा संबंध लोकसभा निवडणुकीशी जोडू नये
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशात आत्तापर्यंत तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज सुरु आहे. या काळातच शेअर बाजारात थोडीशी घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा संबध लोकसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. याबाबत अमिक शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेअर मार्केटमधील घसरणीचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे शाह म्हणाले. या फक्त अफवा असल्याचे शाह म्हणाले. आज सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, तर निफ्टी 200 अंकांनी घसरला आहे.
4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार
एका मुलाखतीदरम्यान अमित शाह यांनी शेअर मार्केटसंदर्भात वक्तव्य केलं. 4 जून 2024 नंतर शेअर मार्केट तेजीत राहणार आहे. दरम्यान, 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालानंतर शेअर बाजार तेजीत असण्याची शक्यता आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर बाजारात सुरू असलेल्या गोंधळामागे सर्व प्रकारच्या अफवा असल्याचे म्हटले आहे.
ज्या ज्या वेळी स्थिर सरकार येते त्यावेळी बाजारात तेजी असते
अमित शाह यांनी दिलेल्या माहितचीनुसार, शेअर बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील शेअर मार्केट 16 वेळा घसरला आहे. त्यामुळं याचा निवडणुकीशी संबंध जोडू नये असे अमित शाह म्हणाले. हे सगळे अफवांमुळं घडत आहे. 4 जूननंतर शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी दिसून येईल असे शाह म्हणाले. याबाबत बोलताना शाह म्हणाले की, ज्या ज्या वेळी देशात एक स्थिर सरकार येते तेव्हा तेव्हा बाजारात तेजी येते. आम्ही यावेळी 400 जागांचा आकडा पार करणार आहोत. त्यामुळं मोदी सरकार सत्तेत येताच शेअर बाजारात देखील तेजी पाहायला मिळेल असे शाह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: