Jack Dorsey : मस्क यांच्या हाती ट्विटरचं पाखरू, ट्विटरचे फाऊंडर जॅक डोर्सी काय करणार?
Jack Dorsey New Bluesky App : ट्विटरचे ( Twitter ) सह-संस्थापक जॅक डोर्सी सध्या एका नवीन ॲपची चाचणी सुरु आहे. युजर्सना येत्या काळात ब्लूस्काय ( BlueSky ) हा नवीन ॲप वापरता येणार आहे. सध्या या ॲपची चाचणी सुरु आहे.
Twitter Vs Bluesky : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्याकडे आता ट्विटर ( Twitter ) कंपनीची मालकी आहे. अखेरीस मस्क यांनी 44 अब्ज डॉलरचा करार पूर्ण करत ट्विटर खरेदी केलं आहे. यामुळे सोशल मीडियावर ( Socail Media ) ट्विटर आणि एलॉन मस्क सध्या चर्चेत आहेत. मस्क यांच्याकडून ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे. दरम्यान, ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी ( Jack Dorsey ) सध्या काय करत आहेत. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
जॅक डोर्सी आणणार नवीन ॲप
मीडिया रिपोर्टनुसार ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी एका नवीन सोशल मीडिया ॲपची चाचणी करत आहेत. डोर्सी यांच्याकडून नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणण्याची तयारी सुरु आहे. डोर्सी यांच्याकडून नवीन ॲपची बीटा चाचणी सुरु आहे. या ॲपचं नाव ब्लूस्काय ( BlueSky ) असं आहे. ब्लूस्काय ॲपचं ( BlueSky App ) टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर युजर्सना नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याची संधी मिळणार आहे.
लवकरच येणार 'ब्लूस्काय' ॲप
एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यापूर्वीच जॅक डोर्सी यांनी जाहीर केलं होतं की, ते सध्या ब्लूस्काय ॲपवर लक्ष केंद्रीत करत आहे. ब्लूस्काय या ॲपलिकेशन तयार करण्याची घोषणा डोर्सी यांनी 2019 मध्ये केली होती. तेव्हापासून या ॲपवर काम सुरु आहे. आता हे ॲपलिकेशन तयार होऊन अखेरच्या टप्प्यात आहे. ही बीटा चाचणी पूर्ण झाल्यावर युजर्सना नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे.
रिपोर्टनुसार, अशी माहिती समोर ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी नवीन सोशल मीडिया ॲपलिकेशनची बीटा चाचणी करत आहेत. मस्क यांना ट्विटरची मालकी मिळाल्यावर डोर्सी खूश नसल्याचं म्हटलं जात आहे. इतरही अनेक युजर्सही मस्क ट्विटरचे मालक झाल्यावर नाराज आहेत. ट्विटर व्यतिरिक्त नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु झाल्यास यूजर्सना ट्विटर ॲप वापरण्याला पर्याय मिळणार आहे.
ब्लूस्काय ॲप काय आहे?
ब्लूस्काय शब्दाचा अर्थ क्रिएविव्ह विचारक्षमता किंवा सर्जनशील विचारशक्ती असा आहे. ब्लूस्काय ॲपबाबत सांगण्यात आलं आहे की, या ॲपची चाचणी पूर्ण होताच, या ॲपचं काम आणि इतर फिचर्सबाबत सांगण्यात येईल. सुरुवातीला ब्लूस्काय हा ट्विटर कंपनी अंतर्गत एक प्रकल्प होता. मात्र ट्विटर सोडण्यापूर्वी जॅक डोर्सी यांनी ब्लूस्कायला स्वतंत्र कंपनी म्हणून स्थान दिलं.
ब्लूस्काय ॲपची ट्विटरसोबत टक्कर
जॅक डोर्सी यांनी मे 2022 मध्ये ट्विटर बोर्ड सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्याआधी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. डोर्सी यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरवर पोस्ट शेअर करत सांगितलं की, ब्लूस्काय कंपनीचा हेतू कोणत्याही कंपनीशी स्पर्धा करण्याचा नाही. 2019 मध्ये Twitter ने BlueSky ॲप बनवण्यास सुरूवात केली होती.