एक्स्प्लोर

Edit Tweet Button : आता ट्वीट करा एडिट, एलॉन मस्क यांची भारतीयांना भेट

Twitter Edit Tweet Button : एलॉन मस्क यांनी पदभार स्वीकारताच ट्विटरमध्ये मोठा बदल झाला आहे. युजर्सना आता 'ट्वीट एडिट'चा ( Twitter Edit Button ) पर्याय उपलब्ध झाला आहे.

Twitter Edit Feature : ट्विटरने ( Twitter ) भारतात 'एडिट ट्विट' बटण ( Edit Tweet Button ) लाँच केले आहे. ट्विटर कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी कंपनीची सूत्रे हाती घेताच ट्विटरमध्ये हा मोठा बदल झाला आहे. ट्विटर एडिट बटणाचा ( Tweer Edit Feature ) पर्याय सध्या उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ट्विटरच्या नव्या फिचरमुळे तुम्हाला तुम्ही ट्वीट केलेलं ट्वीट एडिट म्हणजे दुरुस्त करता येणार आहे. नवीन फीचरमध्ये तुम्हाला ट्वीटच्या शेजारी असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला एडिट ट्वीट असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ट्विट एडिट करता येईल. भारतीय व्हेरिफाईड युजर्सना ( Verified Users ) ट्विटरचं एडिट फिचर वापरता येणार आहे.

भारतीय व्हेरिफाईड युजर्ससाठी एडिट फिचर

पेटीएमचे ( Paytm Owner ) संस्थापक विजय शेखर शर्मा ( Vijay Shekhar Sharma ) यांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट बटणचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यांनी 'ट्वीट एडिट फिचर'चा पर्याय दाखवणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. शर्मा यांनी शुक्रवारी रात्री 10.52 वाजता ट्वीट केलं होतं की, 'हे ट्वीट पोस्ट केल्यानंतर एडिट केलं जाईल.' त्यानंतर रात्री 10.53 वाजता तेच ट्वीट त्यांनी एडिट केलं आणि लिहिलं, 'आता हे एडिट केलेलं ट्वीट आहे.' शर्मा यांनी एडिट केलेल्या ट्वीटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, ट्वीट एडिट बटणाचा हा पर्याय सध्या व्हेरिफाईड युजर्सना हे नवीन फिचर वापरता येणार आहे.
Edit Tweet Button : आता ट्वीट करा एडिट, एलॉन मस्क यांची भारतीयांना भेट

ट्वीट एडिट करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ

ट्विटरने गेल्या महिन्यात सांगितले होते की, एडिट फिचर लाँच करण्यात येणार असून सध्या हे फिचर फक्त निवडक युजर्ससाठी उपलब्ध असेल. या फिचरमध्ये तुम्हाला तुमचं ट्वीट दुरुस्त करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ मिळेल. यूजर्सकडून एडिट फीचरची सर्वाधिक मागणी करण्यात आली होती. यामुळे युजर्सना टायपिंग चूक दुरुस्त करण्याची किंवा ट्वीटमधील हॅशटॅग बदलण्याची संधी मिळेल.

सध्या एडिट फिचर फक्त निवडक युजर्ससाठी

ट्वीट एडिटचं नवीन फिचर सध्या फक्त आयफोन युजर्ससाठी ( Ios Users) लाँच करण्यात आलं आहे. भारतातही व्हेरिफाईड युजर्सना ( Verified Users ) ट्विटरचं एडिट फिचर वापरता येणार आहे. एडिट केलेल्या ट्विटवर युजर्सना ट्वीट एडिट केलेली वेळही दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ट्वीट एडिट केलेला इतिहास तपासू शकता. सध्या हे फीचर निवडक युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. लवकरच एडिट फिटर सर्व युजर्ससाठी लाँच करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget