या आठवड्यात पडणार पैशांचा पाऊस? तब्बल 11 आयपीओ गुंतवणुकीसाठी येणार; पैसे ठेवा तयार!
IPO Update : या आठवड्यात एकूण 11 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. आयपीओंच्या माध्यमातून तुम्हाला चांगले पैसे कमवण्याची संधी मिळू शकते. हे आयपीओ नेमके कोणते आहेत? हे जाणून घेऊ या...
Upcoming IPOs: गेल्या वर्षभरात अनेक दिग्गज कंपन्यांनी आपले आयपीओ आणून मोठे भांडवल उभे केले. या कंपन्या आता शेअर बाजारावर सूचिबद्धही झाल्या असून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहेत. दरम्यान, या आठवड्यातही अनेक नामी कंपन्या आपले आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले करणार आहेत. या आठवड्यात 5 मेनबोर्ड तर 6 एसएमई सेगमेंटचे आपयीओ येणार आहेत. या सर्व 11 कंपन्या आयपीओच्या माध्यमातून साधारण 18,500 कोटी उभे करणार आहेत. हे आयपीओ कोणते आहेत? हे जाणून घेऊ या.
या कंपन्यांचे आयपीओ येणार
या आठवड्यात मेनबोर्ड सेगमेंटमध्ये गुंतवणुकीसाठी खुल्या होणाऱ्या आयपीओंमध्ये विशाल मेगा मार्ट (Vishal Mega Mart), टीपीजी कॅपिटल समर्थित साई लाइफ सायन्सेस (Sai Life Sciences), फिनटेक कंपनी वन मोबिक्विक सिस्टिम्स (One Mobikwik Systems), इन्वेंचरस नॉलेज सोल्यूशन्स लिमिटेड (Inventurus Knowledge Solutions) आणि बॅलैकस्टोनची मालकी असलेल्या डायमंड ग्रेडिंग कंपनी इंटरनेशनल जेमोलॉजिकल इंस्टीट्यूट (इंडिया) (International Gemmological Institute (India)) या कंपन्यांचा समावेश आहे.
6 SME आईपीओ येणार
या आठवड्यात 5 मेनबोर्ड आयपीओंसह (IPO) एकूण एसएमई सेगमेंटमध्ये 6 आयपीओ गुंतवणुकीसाठी येत आहेत. हे सर्व आयपीओ एकूण 150 कोटी रुपये उभारणार आहेत. 150 करोड़ रुपये से अधिक जुटाने का है.
78 मेन बोर्ड कंपन्यांनी जमाक केले 1.4 लाख कोटी रुपये
2024 साली अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ आले. यामध्ये हुंद्याई मोटर इंडिया, स्विगी (Swiggy), एनटीपीसी ग्रीन एनर्जी (NTPC Green Energy), बजाज हाउसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance), ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी (Ole Electric Mobility) यासह 78 इतर कंपन्यांनी मेनबोर्ड सेगमेंटमध्ये आपले आयपीओ आणून एकत्रित 1.4 लाख कोटी रुपये जमा केले. 2023 साली या मेनबोर्ड सेगमेंटमध्ये 57 कंपन्यांनी आयपीओ आणले होते. यातून कंपन्यांनी एकत्रितपणे 49,436 कोटी रुपये जमा केले होते.
आयपीओ गुंतवणुकीसाठी कधी खुले होणार?
विशाल मेगा मार्ट (Vishal Mega Mart), साई लाइफ सायन्सेस (Sai Life Sciences) आणि मोबिक्विक (Mobikwik) हे आयपीओ 11 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुले होते. तर या आयपीओंत 13 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. इन्वेंचर्स नॉलेज सोल्यूशन्स (Inventurus Knowledge Solutions) आणि इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (International Gemmological Institute) हे तीन आयपीओ क्रमश: 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?