टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल, शेतकरी आक्रमक
सध्या राज्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी चिंतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण दिसवेंदिवस टोमॅटोच्या दरात (Tomato Price) घसरण होत होत आहे.
Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी चिंतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण दिसवेंदिवस टोमॅटोच्या दरात (Tomato Price) घसरण होत होत आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक होत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करुन सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले आहे. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.
टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. किलोला पाच ते सहा रुपयांचा दर मिळतच असल्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल करून लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भाजीपाल्याचे दर कोसळले
राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. उन्हाळा आला असताना विविध भाज्यांचे दर दोन रूपयांपर्यंत घसरले आहेत. बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील खत, बियाणे, मजुरी याचा प्रचंड खर्च असूनही बाजारात भाजीपाला अवघ्या 3 ते 12 रुपये किलो दरानं शेतकऱ्याला विकावा लागत आहे. दर घसरल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे.
संपूर्ण हंगामात टोमॅटोची अवस्था अत्यंत वाईट
संपूर्ण हंगामात टोमॅटोची अवस्था अत्यंत वाईट होती. टोमॅटो पाच रुपये किलोनेही विकला जात नाही. टोमॅटोचे भाव वाढले की प्रकरण संसदेत जाते. मात्र यावेळी टोमॅटोची अवस्था अशी आहे की तो पाच रुपये किलोने विकला जात आहे. कमी दर मिळत असल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत असून, त्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतातील टोमॅटोचे पीक वाया घालवत आहेत. पुढच्या पिकासाठीही पैसे नाहीत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी मजुरांची मजुरीही पिकातून निघत नाही. मजुरांची रोजंदारीही 250 रुपये असल्याचे ते सांगतात. मात्र त्यांचा एक क्रेट 50 रुपयांना विकला जात आहे. बाजारात टोमॅटोच्या या अवस्थेने शेतकरी अडचणीत सापडला आहे. एका बाजूला टोमॅटोचा उत्पादन खर्च वाढला असताना दुसऱ्या बाजूला चांगला दर मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
महत्वाच्या बातम्या:























