(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market: ब्लॅक मंडे! शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांच्या 6.32 लाख कोटी रुपयांचा चुराडा
Share Market: मेटल कंपन्या सोडल्या तर इतर सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
मुंबई: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारासोबतच भारतीय शेअर बाजारावर कायम असल्याचा दिसून आलंय. परिणामी भारतीय शेअर बाजार आज चांगलाच गडगडला. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,402 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 366 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.58 टक्क्यांची घसरण होऊन तो 52931.07 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 15879.30 वर पोहोचला आहे. याचा मोठा तोटा गुंतवणूकदारांना होत असून आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 6.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय.
आज बाजार बंद होताना मेटल सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रामध्ये 2 ते 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये आणि स्मॉलकॅपमध्ये प्रत्येकी 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज 837 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2543 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 129 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढीचा परिणाम
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनांच्या किंमतीवर होणार असून येत्या काहीच दिवसांमध्ये देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 10 ते 12 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. या संभाव्य वाढीचा परिणाम हा शेअर बाजारावर होत असल्याची शक्यता काहीजणांनी वर्तवण्यात आले आहेत.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- ONGC- 13.13 टक्के
- Hindalco- 6.16 टक्के
- Coal India- 4.25 टक्के
- Bharti Airtel- 3.32 टक्के
- UPL- 2.54 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- IndusInd Bank- 7.48 टक्के
- Axis Bank- 6.64 टक्के
- Maruti Suzuki- 6.60 टक्के
- Britannia- 6.46 टक्के
- Bajaj Finance- 6.32 टक्के
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha