Tata Group : टाटांचं पाऊल पढती पुढे! एकाचवेळी कमावणार 5,480 कोटी रुपये, वाचा नेमकं प्रकरण काय?
पुन्हा एकदा टाटा समूहाची (Tata Group) शान पाहायला मिळाली आहे. टाटा स्टील ही कंपनी ब्रिटिश सरकार पोर्ट टॅलबोट, वेल्स, युनायटेड किंगडम येथे ग्रीन स्टील प्रकल्प उभा करणार आहे.
Ratan Tata Comapny News : पुन्हा एकदा टाटा समूहाची (Tata Group) शान पाहायला मिळाली आहे. टाटा स्टील ही कंपनी ब्रिटिश सरकार पोर्ट टॅलबोट, वेल्स, युनायटेड किंगडम येथे ग्रीन स्टील प्रकल्प उभा करणार आहे. यामध्ये यामध्ये टाटा स्टील गुंतवणूक करणार आहे. टाटा स्टीलने स्वतःच्या नियामक फाइलिंगमध्ये या कराराची संपूर्ण माहिती दिली आहे. यासाठी यूके सरकार 5480 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
टाटा स्टील 1.25 अब्ज पौंड खर्चून ग्रीन स्टील प्रकल्प सुरू करणार
टाटा स्टीलने युनायटेड किंगडममधील वेल्समधील पोर्ट टॅलबोट येथे 1.25 अब्ज पौंड खर्चून ग्रीन स्टील प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी ब्रिटिश सरकारकडून 500 दशलक्ष पौंड म्हणजेच 5,480 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. पोलाद उत्पादन अधिक पर्यावरणपूरक बनवणे आणि औद्योगिक कार्बन उत्सर्जन 8 टक्के कमी करणे या उद्देशाने यूके पोलाद उद्योगातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. टाटा स्टीलने हे संयंत्र 2025 पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामुळं केवळ ब्रिटनची स्टील उत्पादन क्षमता वाढणार नाही तर प्रादेशिक आर्थिक पुनरुज्जीवन आणि रोजगार निर्मितीलाही मदत होईल.
हा प्रकल्प युरोपमधील सर्वात प्रमुख स्टील उत्पादन केंद्र
हा प्लांट युरोपमधील सर्वात प्रमुख स्टील उत्पादन केंद्र बनू शकतो असे मत टाटा स्टीलचे सीईओ टीव्ही नरेंद्रन यांनी व्यक्त केले. ही भागीदारी बऱ्याच काळापासून अपेक्षित होती. ब्रिटिश सरकारच्या मदतीशिवाय टाटा स्टील आपल्या यूके व्यवसायातून बाहेर पडू शकली असती असंही त्यांनी म्हटलं आहे. टाटा स्टीलने जाहीर केले आहे की त्यांनी सार्वजनिक सल्लामसलत सुरू केली आहे. डिसेंबर 2024 पर्यंत सर्व मंजूरी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे.
पुढील तीन वर्षांत स्टील प्लांट कार्यान्वित होणार
जुलै 2025 पर्यंत साइटवर मोठ्या प्रमाणात काम सुरू होईल आणि पुढील तीन वर्षांत स्टील प्लांट कार्यान्वित होईल. ब्रिटीश सरकारच्या पाठिंब्याने पोर्ट टॅलबोटमधील या प्लांटमध्ये युरोपमधील प्रमुख स्टील उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. साउथ वेल्सच्या आर्थिक पुनरुत्थानासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी त्यांनी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे वर्णन केले. टाटा स्टील बऱ्याच दिवसांपासून ब्रिटीश सरकारच्या या मदतीची वाट पाहत होती आणि सरकारी मदतीअभावी टाटा स्टील यूकेमधील आपल्या स्टील व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करत होती.
महत्वाच्या बातम्या: