Tata Steel: टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये अपघात; अनेक कर्मचारी जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Tata Steel: टाटा स्टील प्लांटमध्ये स्टीम लीकेज झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Tata Steel Plant Accident: ओडिशामधील टाटा स्टील पॉवर प्लांटमध्ये (Tata Steel Plant) स्टीम लीक झाले आहे. या अपघातात काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडलीमध्ये हा अपघात झाला आहे. काही कर्मचाऱ्यांना कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'मनी कंट्रोल'ने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जवळपास 19 कर्मचारी जखमी झाले आहेत.
टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ओडिशातील ढेंकनाल येथील टाटा स्टील मेरामंडली वर्क्स येथे स्टीम लीक झाल्याने BFPP2 पॉवर प्लांटमध्ये अपघात झाला आहे. हा अपघात मंगळवार 13 जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात निरीक्षण-देखरेख करणारे आणि त्या ठिकाणी काम करणारे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सर्व आपात्कालीन प्रोटोकॉल पावले उचलण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली.
In a statement, Tata Steel says, "We are saddened to report an accident at the BFPP2 power plant due to escape of steam at Tata Steel Meramandali Works in Dhenkanal, Odisha. The accident occurred at 1:00 pm (IST) today during the course of the inspection work and has affected a… pic.twitter.com/rycvypRkrR
— ANI (@ANI) June 13, 2023
#WATCH | Odisha: An accident was reported at Tata Steel's Meramandali plant in Dhenkanal. All the injured have been shifted to Cuttack's Ashwini Hospital for treatment. pic.twitter.com/tPZtfAXcyz
— ANI (@ANI) June 13, 2023
अपघाताची चौकशी होणार
टाटा स्टील कंपनीने म्हटले की, या अपघातानंतर त्यांनी पीडित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. कंपनीकडून त्यांना सर्वतोपरी मदत, सहकार्य केले जात आहेय कंपनी अपघाताचे कारण शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली.