Semiconductor : टाटांनी दाखवला मार्ग, आता इस्रायलही मागे आला, अब्जावधीच्या दोन गुंतवणुकीमुळे भारत बनणार सेमीकंडक्टर हब
Semiconductor : भारतात सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी दोन मोठ्या गुंतवणूक होणार आहेत. टाटा ग्रुप आणि इस्त्रायलच्या कंपनीने भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
नवी दिल्ली: येत्या काळात भारताला सेमीकंडक्टर हब (Semiconductor) बनवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विविध देशांसोबत कोट्यवधी रुपयांच्या करारांना मान्यता देण्यात येत आहे. अब्जावधी डॉलर्सचे दोन पूर्ण विकसित अर्धसंवाहक संयंत्र लवकरच भारतात उभारले जाणार आहेत. याशिवाय अनेक चिप असेंब्ली आणि पॅकेजिंग युनिट्सच्या स्थापनेसाठीही गुंतवणूक प्रस्तावित आहे. दोन प्रकल्पांपैकी आठ अब्ज डॉलर्सचा एक प्रस्ताव इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टरचा (Tower Semiconductors) आणि दुसरा प्रस्ताव टाटा समूहाचा (Tata Group) आहे. तसेच 13 कंपन्यांनी चिप असेंब्ली, टेस्टिंग, मॉनिटरिंग आणि पॅकेजिंग (ATMP) साठी स्वारस्य दाखवले आहे.
टाटा समूह 8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे
केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) म्हणाले की, दोन पूर्ण फॅब्स लवकरच भारतात येत आहेत. हे 65, 40 आणि 28 नॅनोमीटर तंत्रज्ञानामध्ये अब्जावधी किमतीचे फॅब असतील. आम्ही इतर अनेक प्रस्तावांचेही मूल्यमापन करत आहोत. इस्त्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टरने सादर केलेल्या 8 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर आणि भारताच्या सेमीकंडक्टर योजनेची स्थिती यावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
तिसऱ्या टर्ममध्ये मंजुरी दिली जाईल
आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी न मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात या प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल अशी माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स. (ATMP) युनिट्ससाठी 13 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव यूएस मेमरी चिप निर्माता मायक्रॉनने गुजरातमध्ये उभारलेल्या 22,516 कोटी रुपयांच्या चिप असेंबली प्लांटच्या व्यतिरिक्त आहेत.
टाटा समूहाची योजना काय आहे?
टाटा सन्सने ईटीला सांगितले की ते लवकरच सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्टिंगचा व्यवसाय सुरू करणार आहे. टाटा समूहाने 2020 मध्ये इलेक्ट्रॉनिक घटकांच्या ग्रीनफील्ड उत्पादनासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स लाँच केले होते. टाटा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी तामिळनाडूच्या पश्चिम जिल्ह्यातील कोईम्बतूर येथे जमीन घेण्याच्या तयारीत आहे. जमीन अधिग्रहित केल्यानंतर कंपनी पुढील वाटचाल करेल.
टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या Tata Electronics ने 2021 मध्ये 4,684 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह फोन पार्ट्स निर्मिती युनिटसाठी तामिळनाडू सरकारसोबत मेमोरँडमवर स्वाक्षरी केली आहे. टाटाच्या या महत्त्वाच्या पाऊलामुळे 18,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळण्याचीही अपेक्षा आहे.टाटाची ही योजना यशस्वी झाल्यास ती तामिळनाडूतील मोबाईल पार्ट्स बनवणारी तिसरी सर्वात मोठी कंपनी बनेल. सध्या तमिळनाडूतील लोकांना तैवानच्या फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनच्या सुविधाही मिळत आहेत.
ही बातमी वाचा: